सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून बरीच चर्चा रंगली आहे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘मलाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (CM Post) विराजमान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे’, असे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद आहेत की काय? अशा चर्चा रंगल्या. तसेच, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) बदलला जाणार की काय? असाही अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. या सर्व चर्चांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाबद्दलच्या गोंधळावर पडदा टाकला. (Shivsena CM Post will not be replaced after 2.5 years clarifies Sanjay Raut Mahavikas Aghadi)
Also Read: Video: बापरे! घाटकोपरमध्ये बघता बघता कार जमिनीने गिळली?
“जर कोणी म्हणत असेल की शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनंतर बदलला जाईल आणि इतर पक्षाचा मुख्यमंत्री त्या जागी विराजमान होईल, तर ते खोटं आहे, अफवा आहे. जेव्हा ३ राज्यांचे सरकार बनवण्यात आलं तेव्हाच हे स्पष्ट करण्यात आलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे कायम राहतील. जर कोणी यापेक्षा वेगळं काही बोलत असेल तर ते खोटं आहे”, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. “मुख्यमंत्रीपद हे पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच आहे. महाविकास आघाडी बनवण्यात आली तेव्हाच हे पद विभागलं जाणार नाही असं तिन्ही पक्षांनी मान्य केलं होतं”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Also Read: ‘तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय’; शिवसेनेवर टीका
“तिन्ही पक्षांची जी चर्चा झाली त्यात मी सहभागी होतो. मी त्या चर्चेचा साक्षीदार आहे. शिवसेनेला दोन्ही पक्षांनी तसा शब्दच दिला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलले आहेत. त्यामुळे मी हे सगळं सांगतोय कारण कोणाच्याही मनात कसलाही संभ्रम राहू नये”, असंही राऊत म्हणाले.
Also Read: नाशिकनंतर आता उल्हासनगरमध्येही ‘मॅग्नेट मॅन’; फोटो व्हायरल

“नाना पटोले जे बोलले त्यात काहीच गैर नाही. काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदासाठी पात्र ठरणारे असे अनेक नेतेमंडळी आहेत. राजकारणात महत्त्वाकांक्षा किंवा मोठी स्वप्न बाळगणं यात काहीच गैर नसतं”, अशा शब्दात त्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली.
Esakal