मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीने (sonalee kulkarni) ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी (kunal benodekar) लग्नगाठ बांधली आहे. वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध झाले. सोनाली आणि कुणालवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. नुकताच सोनालीने कुणालसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दोघे झोपाळ्यावर बसलेले दिसत आहेत. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली. त्या कमेंटवर सोनालीचे उत्तर वाचून अनेकांना हसू आवरले नाही.(sonalee kulkarni give reply to user regarding marriage with marathi boy)

सोनालीच्या फोटोला कमेंट करून एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला,’ एखादा मराठी मुलगा भेटला नाही का लग्न करायला?’ या कमेंट ला रिप्लाय देत सोनाली म्हणाली,’मराठीच आहे’ अनेकांना कुणाल परदेशात राहात असल्याने तो मराठी नाही असे वाटत होते.आता सोनालीने या नेटकऱ्याला उत्तर देऊन सोशल मीडियावर कुणाल मराठी असल्याचे स्पष्ट केले. अनेकांनी ही कमेंट करण्याऱ्या नेटकऱ्याला रिप्लाय देऊन सुनवले आहे. एकाने कमेंट केली,’फालतू चौकशा करायच्या कशाला?’ सोनालीला ट्रोल करायाचा प्रयत्न करणाऱ्या या नेटकऱ्याला अनेकांचे बोलणं ऐकावे लागले.

Also Read: HBD Disha Patani: ग्लॅमरस अभिनेत्रीचे खडतर आयुष्य

सोनाली कुणालसोबतचे फोटो सोशल मीडिवर नेहमी शेअर करत असते कुणाल आणि सोनाली हे दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. कुणालसोबत वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करते.गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला. सोनालीचा पती कुणाल हा लंडनचा असून कामानिमित्त तो दुबईत वास्तव्यास असतो.

soanalee post

Also Read: अंडरटेकरला कोण हरवणार? बॉलीवूडच्या खिलाडीनं स्वीकारलं आव्हान…Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here