EURO Cup 2020 England vs Croatia : युरोपातील लोकप्रिय स्पर्धेतील मोठा फॅन फॉलोवर्स असलेल्या हॅरी केनच्या इंग्लंडने विजयी सलामी दिलीये. क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात स्टार फॉरवर्ड रहीम स्टर्लिंगने 57 मिनिटाला गोल डागत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत इंग्लंडने कडवी झुंज देण्यात माहिर असलेल्या क्रोएशियाला 1-0 असे पराभूत केले. पहिल्या हाफमध्ये कोणत्याही संघाला गोल डागता आला नाही.
दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर 57 व्या मिनिटाला इंग्लंडकने संधी निर्माण केली. केन्विन फिलिप्सने केलेल्या असिस्टच्या जोरावर रहीम स्टर्लिंगने क्रोएशियाचा गोल किपर लिवोकोविचला चकाव देत संघाला आघाडी मिळवून दिली.

पहिला हापमध्ये काँटे की टक्कर, पण…
ग्रुप डी मधील इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील लढत लक्षवेधी लढतींपैकी एक होती. पहिल्या हाफमध्यो दोन्ही संघात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात दोन्ही संघात अधिक अंतर नव्हते. इंग्लंडने 58 टक्के तर क्रोएशियाने 42 टक्के बॉल पजेशन आपल्याकडे ठेवले. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडाला गोल डागण्याच्या चार संधी निर्माण झाल्या होत्या. पण त्यातील एकच शॉट ऑन टार्गेट लागला. तोही गोलीने उत्तमरित्या अडवला. क्रोएशियाने दोन पैकी एक शॉट ऑन टार्गेट लागला. यावेळी इंग्लंडच्या गोलकिपरने उत्तमरित्या चेंडू अडवून त्यांचे इरादे फोल ठरवले.
Also Read: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी?
Esakal