जुन्नर : पावसाची रिमझिम, धुक्याची दुलई, खळखळणारे ओढे-नाले, मनमोहक धबधबे, धरतीने पांघरलेली हिरवी शाल आणि याच्या जोडीला आल्हाददायक थंडी अनुभवण्यासाठी सद्या नाणेघाट व दाऱ्याघाटाकडे पर्यटकांचा ओढा वाहू लागला आहे. दुचाकी,चारचाकी वाहनातून युवक तसेच कौंटूंबिक सदस्य येथे सुट्टीच्या दिवशी सहलीसाठी येत आहेत यामुळे नाणेघाट वाहनांच्या व पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना अजून गेला नाही, लॉक डाऊन कायम आहे, पर्यटन स्थळे बंद आहेत यामुळे लोकहो पर्यटन व कौटुंबिक सहली थांबवा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या शनिवार व रविवारी सहलीसाठी येथे पुणे , ठाणे जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. नाणेघाटात होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

शनिवारी (ता.१३) रोजी केलेल्या विनाकारण फिरणाऱ्या ४९ जणांवर केलेल्या कारवाईत २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई दररोज अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितलेयाशिवाय मास्क न वापरणाऱ्या पाच जणांकडून एक हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नियम मोडणाऱ्या आठ दुकाने व तत्सम व्यक्तीवर कारवाई करून ८ हजार ५०० रुपये असा एकूण ६२ व्यक्तीकडून ३४ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here