क्वीन एलिझाबेथ यांना ओळखत नाही अशी या जगात एकही व्यक्ती नाही. ब्रिटनच्या या राणीची कायमच सर्वत्र चर्चा रंगत असते. क्वीन एलिझाबेथ समाजात कशा वावरतात, त्यांची लाइफस्टाइल कशी आहे याकडे कायमच प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं असते. विशेष म्हणजे त्यांना भेटण्याची अनेकांची इच्छाही असते. म्हणूनच क्वीन एलिझाबेथ यांची भेट घेतांना कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा टाळाव्यात ते पाहुयात. क्वीन एलिझाबेथ यांच्यासमोर नतमस्तक झालेलं त्यांना कधीच आवडत नाही. त्यामुळे त्यांना भेटल्यावर मान छुकवण्याऐवजी हस्तांदोलन करा. परंतु, जर त्यांनी हात पुढे केला तरच हस्तांदोलन करा. क्वीन एलिझाबेथ यांना भेटल्यावर कधीच त्यांचा अपमान होईल असं वर्तन करु नका. नियम किंवा परंपरेनुसार, कायम त्या प्रथम चर्चेला सुरुवात करतात हे लक्षात ठेवा. चर्चा संपल्यानंतर कधीही क्वीन एलिझाबेथ यांना अलिंगण देऊ नका. केवळ हस्तांदोलन करा. त्या चालू लागल्यावर तुम्ही त्यांना फॉलो करा. त्या बसल्या की तुम्ही बसा. तसंच त्यांच्यासोबत जेवण करत असाल तर त्यांनी जेवायला सुरुवात केल्यावरच तुम्ही जेवणास सुरुवात करा. क्वीन एलिझाबेथ यांना भेटवस्तू देतांनादेखील नीट विचार करा. कारण, तुम्ही दिलेली भेट रॉयल कलेक्शनमध्ये ठेवण्यात येते.