बंगाल हिंसाचार प्रकरणी पिडीतेची सर्वोच्च न्यायालयात धाव; SIT चौकशीची मागणी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नुकत्याच विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडल्या. ममता बॅनर्जींच्या (Mamta Banerjee) तृणमूल काँग्रेसने (TMC) या निवडणुकीत दमदार यश मिळवलं. या निवडणुकांच्या आणि त्यानंतरच्या काळात अनेक ठिकाणी हिंसाचार (Post poll violence) पाहायला मिळाला. त्याच दरम्यान काही महिलांवर बलात्कार (gang rape) झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या महिलांनी आपल्यासोबत घडलेले अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले आणि या प्रकरणी अधिक तपशीलवार तपास केला जावा, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. (Bengal rape survivors of post poll violence narrate horrific experience move to Supreme Court to demand SIT)

Also Read: “प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी अन्…”; आठवलेंची नवी कविता

पश्चिम बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल कित्येक महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि SIT म्हणजे विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावेळी त्यांनी स्वत:वर झालेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली. टीओआयच्या वृत्तानुसार, पिडीत महिलांपैकी 60 वर्षीय महिलेने सांगितले की 4 मेच्या रात्री टीएमसी कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने आमच्या घरात घुसून माझ्या नातवासमोर माझ्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आमचं घरदेखील लुटून नेलं. ही घटना बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात घडली. तिने केलेल्या याचिकेत असंही नमूद करण्यात आलं आहे की, तृणमूल पक्षाला आमच्या क्षेत्रात अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्याकडून सूडभावनेने अशाप्रकारे घृणास्पद कृत्य करण्यात आली. पश्चिम बंगालमधील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या संबंधी कारवाई करत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत, असेही त्या महिलेने म्हटले आहे.

girl-rape

Also Read: शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात…

“2 मे रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा झाली. त्यानंतर पुढच्याच दिवशी याचिककर्त्याच्या घराभोवती सुमारे 100-200 लोकांची गर्दी होती. ते लोक तृणमूल काँग्रेस पक्षाचे समर्थक होते. महिलेच्या कुटुंबातील लोकांनी त्या लोकांना तिथून निघून जाण्यास सांगितले. पण त्यांनी ते ऐकलं नाही, उलट त्यांनीच तिच्या कुटुंबीयांनी तिथून निघून जाण्यास सांगितलं आणि धमकावलं. तसेच, अर्जदाराच्या सूनेलाही बेदम मारहाण केली. 4 मे रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास टीएमसीचे पाच जण पुन्हा अर्जदाराच्या घरी आले आणि त्यांना जबरदस्तीने घरात नेले. या कार्यकर्त्यांनी अर्जदार महिलेला बेडीने बांधले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच तिच्यावर विषप्रयोगही केला”, असेही या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे, या प्रकरणाची कोर्टाच्या देखरेखीखाली CBI किंवा SIT चौकशी केली जावी अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.

Also Read: Video: बापरे! घाटकोपरमध्ये बघता बघता कार जमिनीने गिळली?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here