वॉशिंग्टन : Novavax ने आज 14 जून रोजी घोषणा केली आहे की, त्यांची कोरोनावरील लस तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल ट्रायलमध्ये अत्यंत प्रभावी ठरली आहे. याची ट्रायल कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर देखील केली गेली. अमेरिकेतील या बायोटेक्नोलॉजी कंपनीने म्हटलंय की, या लसीचं कोडनेम NVX-COV2373 आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी Novavax 90 टक्के प्रभावी असून मध्यम ते गंभीर संक्रमणाला रोखण्यासाठी 100 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. (Novavax COVID19 vaccine final efficacy of 90 percent against COVID 19 strain in a pivotal Phase 3 trial in UK)

कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन (CIPI) सोबत एकत्र येत विकसित केलेल्या या लसीने व्हेरियंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्टच्या विरोधात देखील 93 टक्के परिणामकारकता दाखवली आहे. या लसीचे अधिक जोखिम असलेल्यांमध्ये देखील प्रभावीपणा दाखवला आहे. यामध्ये 65 वर्षांहून अधिक वयाचे तसेच त्यापेक्षा कमी वयाचे मात्र सहव्याधी असणाऱ्यांवर या लसीची ट्रायल घेण्यात आली होती.

Also Read: ‘जगाला दिलेलं शहाणपण आधी भारतात अंमलात आणा’

Corona Vaccine

या दोन शॉटच्या लसीला 2 ते 8 डीग्री सेल्सियलच्या दरम्यान ठेवण्याची गरज असते. यामुळे लसीला स्टोअर करणे तसेच त्याची वाहतुक करणं सोपं होणार आहे. खासकरुन विकसनशील देशांमध्ये लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका निभावण्याची आशा आहे.

मात्र, ही लस प्रत्यक्षात वापरात येण्यास अद्याप वेळ आहे. कंपनीने म्हटलंय की, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अमेरिका, युरोप आणि इतर ठिकाणी लसीच्या मंजूरीसाठी कंपनी तयारीत आहे. तोपर्यंत प्रत्येक महिन्याला 100 दशलभ डोस आणि डिसेंबरपर्यंत 150 दशलक्ष डोस प्रति महिना बनवण्यासाठी कंपनी सक्षम असेल.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here