चेन्नई : तमिळनाडूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत राहिलेला अण्णा द्रमुक पक्ष सध्या विरोधी बाकांवर बसला आहे. जयललिता यांच्या जाण्यानंतर या पक्षातील अंतर्गत खलबते काही थांबायचे नाव घेत नाहीयेत. अण्णा द्रमुकने आज सोमवारी पक्षातील 16 पदाधिकाऱ्यांना काढून टाकलं आहे. या नेत्यांनी पक्षाच्या आधीच्या नेत्या वीके शशीकला यांच्यासोबत चर्चा केली होती. पक्ष विरोधी हालचालींचा ठपका ठेवत पक्षाचे प्रवक्ते वी पुगाझेंदी यांना देखील पक्षातून हाकलण्यात आलं आहे. (Tamil Nadu AIADMK expels 16 party functionaries who interacted with former party leader VK Sasikala)

Also Read: कोरोना काळातील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची नवी योजना

यासोबतच पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका वक्तव्यात अण्णा द्रमुकने शशीकलांच्या पार्टी केडरसोबत झालेल्या फोनवरील बातचीतीला ‘ड्रामा’ ठरवलं आहे. पक्षाने म्हटलंय की पक्ष कधीच एका कुटुंबाच्या इच्छेसाठी स्वत:ला उद्ध्वस्त करुन घेणार नाही. पक्षाने म्हटलंय की शशीकला यांच्याशी बोलणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अशीच कारवाई केली जाईल.

Sasikala

कोण आहेत शशीकला?

कधीकाळी तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर कुणाचं नाव घेतलं जायचं तर ते होतं शशीकला यांचंच! मुख्यमंत्री पदावर जयललिता होत्या… मात्र पडद्याच्या मागे त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे आणि हालचालीमागे शशीकला यांचा सल्ला असायचा, असं म्हटलं जायचं. त्या यावर्षीच जानेवारी महिन्यात तुरुंगातून सुटून आल्या आहेत. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांना कोर्टाने 4 वर्षांची जेल सुनावली होती. त्यांच्या या सुटकेनंतर येऊ घातेलल्या तमिळनाडूच्या राजकारणात काय घडेल, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या निवृत्तीची ही घोषणा झाली आहे. या शशीकला काही सामान्य कार्यकर्त्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना आश्चर्यकारक आहेत. 90 च्या दशकात त्या जयललितांना भेटल्या. त्यानंतर त्यांच्यात दिवसेंदिवस घट्ट मैत्री बनत गेली.. इतकी दृढ मैत्री की जयललितांनंत त्यांचंच नाव घेतलं जायचं. 1984 साली शशीकला एक व्हिडीओ पार्लर चालवायच्या. त्यांचे पती नटराजन जनसंपर्क अधिकारी होते. शशीकला यांना जयललिता यांच्या मींटिंगमध्ये व्हिडीओग्राफी करण्याची संधी मिळाली आणि तिथेच या दोघींचीही एकमेकांशी भेट झाली. या एका साध्या भेटीने पुढे तमिळनाडूचं राजकारण ढवळून काढलं.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here