चेन्नई : सोशॅलिझम व ममता बॅनर्जी हे विवाह बंधनात अडकले, हे ऐकायला विचित्र वाटते ना? पण हा विवाह तमिळनाडूत सालेम जिल्ह्यात काल रविवारी झाला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) चे सालेम जिल्हा सचिव ए. मोहन यांचे पुत्र व काँग्रेससंबंधी कुटुंबातील वधू ममता बॅनर्जी यांचा विवाह काल साधेपणाने झाला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरुन या कुटुंबाने मुलीचे नाव ‘ममता बॅनर्जी’ असे ठेवले होते. मोहन यांच्या घरातील सदस्यांना समाजवादी पक्षाशी संबंधित कम्युनिझम, लेनिनीझम आणि मार्क्सझिझम अशी नावे आहेत. सालेममध्ये लॉकडाउन असल्याने या विवाहाला वधू-वराचे कुटुंबच केवळ उपस्थित होते. यात मोहन यांचे कम्युनिझम, लेनिनीझम हे दोन पुत्र आणि मार्क्सझिझम हा नातू उपस्थित होता. वर सोशॅलिझम हे मोहन यांचे तिसरे पुत्र आहेत. (Socialism Marries Mamata Banerjee In Tamil Nadu)

Also Read: शशीकलांशी बोलणाऱ्या 16 नेत्यांची AIADMK कडून हकालपट्टी

यावेळी वधू ममता बॅनर्जीने म्हटलंय की, पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता दीदींनी एकहाती विजय मिळविल्यानंतर ‘ममता बॅनर्जी’ यांच्‍या नावातील ताकद मला समजली. या अनोख्या विवाहाची पत्रिका गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा लग्नाला उपस्थित राहण्याची आणि वधू-वरांना आशीर्वाद देण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती, पण लॉकडाउनमुळे पोलिसांनी फक्त कुटुंबीयांनाच परवानगी दिली होती. विवाहाला उपस्थित राहता आले नाही तरी परिचित व अपरिचितांकडून अभिनंदनाचे शेकडो संदेश मिळाल्याचे सोशॅलिझम यांनी सांगितले.

Also Read: कोरोना काळातील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची नवी योजना

रशियाच्या साम्यवादाचा पगडा

कम्युनिस्ट कुटुंबात वाढलेल्या मोहन यांनी त्यांचे आयुष्य समाजवादी विचारसरणीचा प्रसार करण्यात घालविले आहे. तत्कालीन सोव्हिएत रशियाचे विभाजन १९९१ मध्ये झाले तेव्हा ते खूप निराश झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. समाजवादाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी जन्मलेल्या मुलाचे नान कम्युनिझम ठेवले. त्यानंतर रशियाचे नेते लेनिन यांची आठवण म्हणून मोहन यांनी दुसऱ्या मुलाचे नाव लेनिनीझम ठेवले व तिसऱ्याचे नामकरण सोशॅलिझम असे झाले. एवढेच नाही तर मोहन यांच्या नातवाचे नाव मार्क्सझिझम असे ठेवण्यात आले. ही नावे इतरांना विचित्र वाटत असली तरी या भागात ती रुळलेली आहेत. येथे काही व्यक्तींची नावे ‘मॉस्को’, ‘रशिया’, ‘व्हिएतनाम’ आणि ‘झेकोस्लोव्हाकिया’ अशी आहेत, असे मोहन म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here