नवी मुंबईतील राहत्या घरी त्याने आपल्या मुलांना बोलावलं आणि…
नवी मुंबई: ऐरोलीतील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपल्याच दोन मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. भगवान पाटील असं या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी स्वत:च्या दोन मुलांना घरी बोलावले आणि त्यानंतर त्या दोन मुलांच्या अंगावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची विचित्र घटना घडली. भगवान पाटील हे नवी मुंबईतील ऐरोली येथे राहत होते. त्यांच्या राहत्या घरी हा धक्कादायक प्रकार घडला. (Navi Mumbai Crime Retired Police Officer Father shot two sons one seriously injured other one narrowly escaped)
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटील यांनी आपल्या राहत्या घरात विजय आणि सुजय या दोन मुलांवर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या. ऐरोली सेक्टर २ मध्ये राहत असणारे पाटील यांनी आपल्या पोटच्या दोन मुलांना आपल्या घरी बोलावले. ते दोघे जण घरी येताच त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या आपल्या मुलांच्या दिशेने झाडल्या. या प्रकारात एका मुलाला दोन गोळ्या लागल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर इंद्रावती या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या मुलाला गोळी केवळ चाटून गेल्यामुळे तो थोडक्यात बचावल्याचेी माहिती आहे.

कौटुंबिक वादातून वडिलांनी आपल्या दोन मुलांवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. मुलांचे वडिलांशी पटत नव्हते. त्यांचे आपसांत काही मतभेद होते. हे मतभेद फारच टोकाला गेल्यामुळे मुलांनी अशा पद्धतीचे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद घेत पोलिसांनी भगवान पाटील यांना ताब्यात घेतलं आहे.
Esakal