नाल्यातील कचऱ्यावर बसवलेल्या सफाई कंत्राटदाराची धमकी

मुंबई: शहरात सध्या नालेसफाईचा मुद्दा चांगलाच गाजतोय. आठवडाभरापासून मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यावेळी हा पाणी तुंबण्यामागे नालेसफाईतील कामचुकारपणा असल्याचं सांगण्यात आलं. या मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून टीका सुरु असतानाच चांदिवलीत शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी चक्क कंत्राटदाराच्या सुपरवायझरला नाल्याच्या कचऱ्यात बसवलं. या घटनेमुळे खजील झालेल्या सुपरवायझरने आत्महत्येची धमकी दिली आहे. (I will suicide if Shivsena MLA will not be punished Warns Contractor who was made to sit on waterlogged street in Mumbai)

Also Read: शिवसेना आमदाराने नालेसफाई कंत्राटदाराला बसविले कचऱ्यात

चांदिवली येथील संजयनगर भागात मोठया प्रमाणत नाले तुंबले होते. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्थानिक आमदार दिलीप लांडे तेथे पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्तेदेखील होते. या कार्यकर्त्यांनी नालेसफाई सुरू केली आणि त्याच वेळी नालेसफाईचं कंत्राट दिलेल्या पालिकेच्या कंत्राटदारालाही थेट त्या नाल्यात बसवलं व त्याच्यावर तो कचरा फेकला. घडलेल्या प्रकारामुळे खजील झालेल्या नरपत कुमार याने थेट पोलिसांना पत्र लिहिले. लांडे यांच्यावर योग्य ती कारवाई करा अन्यथा मी आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार लांडे असतील, असे त्याने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Also Read: ‘तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय’; शिवसेनेवर टीका

“मी माझं काम योग्यप्रकारे करतो. मला जो नाला साफ करण्याचे कंत्राट देण्यात आले होते, त्याची साफसफाई मी नीट पद्धतीने केली होती. पण ज्या दिवशी हा प्रकार घडली त्यादिवशी कोणीती मुद्दाम नाल्यात कचरा टाकला आणि त्या कचऱ्यात मला बसवण्यात आलं. घडलेल्या घटनेचामुळे माझ्यावर मानसिकदृष्ट्या तणाव आला आहे. माझी कंबरदेखील दुखत असून माझ्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. माझी अशी मागणी आहे की माझ्यासोबत हे कृत्य करणाऱ्या लांडे यांच्यावर कारवाई केली जावी, अन्यथा मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी आमदार दिलीप लांडे व त्यांचे साथीदार जबाबदार असतील”, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Also Read: शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात…

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here