महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून येथील तलाव आतापासूनच तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.शुक्रवारपासून महाबळेश्वरात पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. शहरात नाक्यावर पालिकेच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात आहे. शिवाय शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सध्या महाबळेश्वरात कडक लाॅकडाउन सुरु असून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे या भागात पर्यटकांची संख्या देखील कमी पहायला मिळत आहे.वेण्णालेक परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने बोटीही बंद ठेवण्यात आल्या आहेत.पावसामुळे इमारतींचे नुकसान होऊ नये, यासाठी प्लास्टिक, झड्या लावण्यात येत आहेत. (सर्व छायाचित्र : प्रमाेद इंगळे, सातारा)