सातारा : गळीत हंगामात शासनाने जाहीर केलेल्या सूत्रानुसार एफआरपी (FRP) न देणाऱ्या साखर कारखान्यांवर (Sugar Factory) ऊस नियंत्रण आदेशातील कलमानुसार कार्यवाही होण्यासाठी महसुली प्रमाणपत्र मागणी करणारे पत्र नुकतेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे (Dhananjay Doiphode) यांनी साखर आयुक्तांना दिले आहे. या पत्रात एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांच्या यादीत ‘कृष्णा, देसाई, अजिंक्यतारा’सह आठ कारखान्यांचा समावेश आहे. (Action Will Be Taken Against FRP Exhausting Sugar Factories Satara Marathi News)
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून, २०१०-२०२१ या काळात गाळप होणाऱ्या उसाच्या बदल्यात एफआरपीचे सूत्र शासनाने जाहीर केले होते.
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून, २०१०-२०२१ या काळात गाळप होणाऱ्या उसाच्या बदल्यात एफआरपीचे सूत्र शासनाने जाहीर केले होते. यानुसार नव्वद टक्के एफआरपी कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. असे असतानाही अनेक कारखान्यांनी या अटीचे पालन न केल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले. यानुसार ता. ३१ मेअखरेपर्यंतचा पंधरवडा अहवाल तयार केला. यानुसार जिल्ह्यातील अजिंक्यतारा कारखान्याच्या जाहीर सूत्रापैकी ८५ टक्के, ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ७६ टक्के, उपळवे येथील स्वराज इंडिया ॲग्री प्रायव्हेटने ८१ टक्के, चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सने ८५ टक्के, रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याने ८६ टक्के, धावडवाडी येथील जयवंत शुगरने ८५ टक्के, गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगरने ८० टक्के, फलटण येथील शरयू ॲग्रोने ७४ टक्के एफआरपी अदा केल्याचे समोर आले.
Also Read: धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ

शासनाने जाहीर केलेल्या सूत्रानुसार एफआरपी न देता ती थकीत ठेवणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी या कारखान्यांविरोधात येत्या काही दिवसांत कारवाई प्रस्तावित होण्याची शक्यता आहे. थकीत एफआरपी वसुलीसाठी या कारखान्यांच्या विरोधात ऊस दर नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३(८)नुसार महसुली प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे पत्र डोईफोडे यांनी पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयास सादर केले आहे.
Also Read: ‘त्या’ कृषी दुकानांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू
कारवाईचे लेखी आश्वासन : झणझणे
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना थकीत ऊसबिले देऊन एफआरपी थकीत ठेवणाऱ्या कारखान्यांवर जप्ती आदेश द्यावेत, अशी मागणी फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने प्रदीप झणझणे यांनी पत्राद्वारे साखर आयुक्त कार्यालयाकडे केली होती. यानुसार पडताळणी करत केलेल्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत थकबाकीपोटी जिल्ह्यातील कारखान्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याची माहिती झणझणे यांनी दिली.
Action Will Be Taken Against FRP Exhausting Sugar Factories Satara Marathi News
Esakal