UEFA Euro 2020 Poland vs Slovakia : युरो कप स्पर्धेतील ई गटातील रंगतदार सामन्यात मिलान स्क्रिनियारने केलेल्या गोलच्या जोरावर स्लोवाकियाने पोलंडला 2-1 असे पराभूत केले. सेंट पीटर्सबर्गच्या क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात स्लोवाकियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. पोलांडने सुरुवातीच्या 10 मिनिटात मिळालेल्या संधी दवडल्यानंतर रॉबर्ट माकने 18 व्या मिनिटाला अप्रतिम गोल डागत स्लोवाकियाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये स्वोवाकियाने ही आघाडी कायम राखली.

त्यानंतर दुसऱ्या हाफमधील सुरुवातीच्या मिनिटाला पोलंडकडून कारोलने पहिला वहिला गोल डागला. या गोलसह 46 व्या मिनिटाला पोलंडने सामना बरोबरीत आणला. खेळातील 62 व्या मिनिटाला पोलंडचा ग्रझेगोर्झ क्रिचॉवियाक याने स्लोवाकियाच्या जाकोब ह्रोमाडाला दिलेली चॅलेंज पोलंडला चांगलेच महागात पडले. क्रिचॉवियाकला सामन्यातील दुसरे येलो कार्ड रेडमध्ये बदलले आणि पोलंडला 10 गड्यानिशी खेळण्याची वेळ आली.

Also Read: EURO च्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या हाफमध्ये गोलची बरसात!

10 गड्यांसह बरोबरी कायम ठेवण्याचे आव्हान पोलंडला पेललं नाही. एक गडी कमी झाल्याचा फायदा उठवत स्वोवाकियाने आक्रमण वाढवले. 69 व्या मिनिटाला मिलानने गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत स्लोवाकियाने बाजी मारली. अतिरिक्त वेळेत पोलंडला बरोबरी करण्याची संधी मिळाली. पण त्यांना याचा फायदा उठवता आला नाही त्यामुळे त्यांच्या पदरी पराभवच पडला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here