जळगाव ः कोरोना महामारीची (corona 2nd wave) )दुसरी लाट ओसरण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असला, तरी जिल्हा आरोग्य यंत्रणेने (Department of Health) तिसऱ्या लाटेचा (corona third wave) सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा अधिक जाणवला, बेडची संख्या कमी होती. ती तिसऱ्या लाटेत येऊ नये यासाठी जिल्ह्यात तब्बल बारा ठिकाणी ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) निर्मितीचे कार्य सुरू आहे. आगामी महिनाभरात ऑक्सिजन प्लांट होऊन त्याद्वारे दरदिवशी नऊ ते दहा हजार सिलिंडर भरेल एवढा ऑक्सिजन तयार होणार आहे. यामुळे तिसऱ्या लाटे ऑक्सिजन टंचाईचा सामना जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला करावा लागणार नाही, हे निश्चित. (corona third wave preparation in jalgaon district)
Also Read: कोरोना संसर्ग आटोक्यात; बाधितांचा चाळीसगावात दुहेरी आकडा
जिल्ह्यात सध्या जिल्हा कोविड रुग्णालय, भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती सुरू आहे. मोहाडी येथील रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट, जिल्हा रुग्णालयात एक, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव येथे ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम सुरू आहे. सर्व प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मितीची वेगवेगळी क्षमता आहे. त्या एकत्र केली असता नऊ हजार ५०० ते दहा हजार सिलिंडर दररोज भरतील एवढा ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. तिसऱ्या लाटेतील रुग्णासाठी ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणारे हे प्लांट आगामी अनेक वर्ष जिल्ह्यातील रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन पुरवतील.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होईल, अशी शक्यता आहे. जेव्हा लाट येईल तेव्हा येईल; मात्र आतापासूनच शासनासह खासगी डॉक्टरही मुलांची काळजी कशी घ्यावी, मुलांना या लाटेपासून कसे सुरक्षित ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन करताहेत. जिल्हा रुग्णालयात बालरोग विभाग असला तरी त्यात बालरोगतज्ज्ञांची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे. असे असताना तिसऱ्या लाटेत बालकांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची कमतरता भासू शकते, असे चित्र आहे.
त्यावर आरेाग्य यंत्रणेने त्याच्याकडील पाच डॉक्टर, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील दहा, असे पंधरा शासकीय बालरोगतज्ज्ञांना तिसऱ्या लाटेत उपचारासाठी बोलाविण्याचे नियोजन आहे. सोबतच खासगी बालरोगतज्ज्ञांनाही मदत घेऊन दोन-तीन टीम तयार करून बालकांवर उपचार करण्याचे नियोजन सुरू आहे.
अशी आहे आकडेवारी…
* ऑक्सिजन बेड – ३,५००-४,०००
* मोहाडी रुग्णालयात असतील – ९०० बेड
* ऑक्सिजनची निर्मिती – १२ ऑक्सिजन प्लांटमधून
* बालकांसाठीचे मोठे वॉर्ड असतील – तीन ठिकाणी
* बालरोगतज्ज्ञांची टीम – दोन (एका टीममध्ये १२ डॉक्टर)

तिसऱ्या लाटेसाठी किमान चार हजार ऑक्सिजनयुक्त बेडची तयारी आम्ही केली आहे. शासकीय जिल्हा रुग्णालय, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयासह खासगी रुग्णालयात हे बेड असतील. मोहाडी येथील महिला रुग्णालय ९०० बेड ऑक्सिजनयुक्त असेल. शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ पंधरा आहेत. आणखी खासगी बालरोगतज्ज्ञांची मदत घेऊ.
– डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक
Esakal