जळगाव ः जिल्ह्यात कोरोना (corona) महामारीत दोन्ही पालक (आई, वडील) गमाविलेली १२ बालके आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ४५० बालक कोरोनामुळे एक पालक गमाविलेली आहेत. दोन्ही पालक गमाविलेल्यांना शासकीय मदत (Government assistance) देण्यासाठी त्यांच्या घरी जावून त्यांचे संगोपन कोण करतेय, त्यांचे मनोबल वाढेल, त्यांना इतर सुविधा काय देता येतील याबाबत माहिती घेण्यात आली आहे. १२ बालकांपैकी जी बालके १८ वर्षाआतील आहे, अशांना शासकीय मदत देण्यासाठी त्यांचे आधारकार्ड सिडींग करण्याचे कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली. (lost both parents in the corona epidemic aadhar siding work)
Also Read: ‘जीआय’ मानांकित केळी प्रथमच अरब देशात !
कोरोना महामारीने दोन पालक, एक पालक गमाविलेल्या बालकांसाठी जिल्हा कृती दल (District Action Team)जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे. या समितीचे पदाधिकारी पालक गमाविलेल्यांचा आधार बनत आहे. त्यासाठी अशा बालकांना जाऊन भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, आता व भविष्यात काय अडचणी त्यांच्यासमोर आहेत, त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे.

या बालकाचे होणार संगोपन
एक पालक गमाविलेल्या ४५० बालकांपैकी २०० बालकांच्या घरी आगामी आठ दिवसात जाऊन त्यांची इत्थंभूत माहिती गोळा करून त्यांना कशा प्रकारे शासकीय, सामाजिक संस्थाद्वारे मदत मिळवून देता येईल याबाबत समिती निर्णय घेणार आहे. त्यांच्या संगोपनाविषयी बाल संगोपन योजना लागू करून त्यांचे संगोपन केले जाणार आहे.
Also Read: दहा हजार ऑक्सिजन सिलिंडरची रोज होणार निर्मिती
शिक्षणासाठी मदत..
शिक्षणासाठी त्यांना जी मदत लागेल तीही मिळवून दिली जाणार आहे. जी मुले अठरा वर्षावरील आहे अशांसाठी सामाजिक संघटनांना एकत्र करून त्यांना मदतीची दिशा ठरविली जाईल. विशेष करून या सर्व बालकांना सुरक्षितता आहे का ? हे पाहून ती अगोदर देण्याचा प्रयत्न असणार आहे.
Esakal