दिल्ली येथील इंडिया गेट, लाल किल्ला व्यतरिक्त लाेटस टेंपल (lotus temple) जे नेहरू प्लेसमध्ये स्थित आहे. त्यास नक्की भेट द्या. हे 1986 मध्ये बांधले गेले. कमळाच्या आकारातील मंदिराचे पर्यटकांना माेठे आकर्षण आहे.

लाेटस टेंपल बहाई मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातील सर्वात्कृष्ट वास्तुशिल्प ठरले आहे. पांढ-या संगमरवरी रचनेतील या वास्तुस 20 व्या शतकातील ताजमहाल देखील म्हटले जाते.
हे एक बहाई मंदिर आहे, जेथे कोणत्याही देव देवतांची मूर्ती नाही. लोक येथे ध्यान करण्यासाठी बसतात. सर्वजाती धर्मातील पर्यटकांना बहाई मंदिर आकर्षित करते.
चीनच्या धर्तीवर येथे एका काचेचा पूल बांधण्यात आला आहे. तेथून पर्यटक निसर्गचा आनंद लुटू शकतात.
हे मंदिर अर्धवट फुललेल्या कमळाच्या आकारात बांधण्यात आले असून त्यामध्ये २ चक्रात 27 संगमरवरी पाकळ्या ठेवल्या आहेत. मंदिराला चारी बाजूंनी 9 दरवाजे आहेत आणि मध्यभागी एक माेठा हॉल आहे. ज्याची उंची 40 मीटर आहे, सुमारे 2500 लोक या हॉलमध्ये एकत्र बसू शकतात. 2001 च्या अहवालानुसार, जगातील सर्वात जास्त भेट दिलेल्या ठिकाणी म्हणून त्याचे वर्णन केले गेले.
बिहार पाठाेपाठ देशातील प्राचीन इतिहासासाठी दिल्ली एक प्रमुख शहर म्हणून आेळखले जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here