सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या (covid19 ) संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. आज (मंगळवार) जिल्ह्यात 832 नागरिक कोरोनाबाधित (covid19 patients) आढळले आहेत. याबराेबरच 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (death) झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. (satara-marathi-news-covid19-patients-increased-karad-29-dead)

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून, जिल्ह्यातील गृह विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दिवसेंदिवस वाढणारी बाधित रुग्णांची साखळी तुटताना दिसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण कमी होताना आढळून येत आहे, तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूची संख्या काही अंशी स्थिर असल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर, शहरासह ग्रामीण भागातील हॉटस्पॉटची संख्याही घटत चालली असून, कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहेत, तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कोरोना केअर सेंटर आदी ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

Also Read: मराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; कसं असेल स्वरुप?

दरम्यान, जिल्ह्यात आज नऊ हजार 988 बाधितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. ही संख्या साेमवारपेक्षा 200 ने वाढली असली तरी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. याचबरोबर कराड तालुक्‍यात सर्वाधिक 204 बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच सातारा तालुक्यात 12 बाधितांचे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Also Read: बेलवडे बुद्रुक, करपेवाडीवर शाेककळा; साेमवार ठरला घात वार

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज (मगळवार) अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 25 (8134), कराड 204 (24929), खंडाळा 33 (11274), खटाव 97 (18341), कोरेगांव 54 (15788), माण 66 (12445), महाबळेश्वर 2 (4182), पाटण 42 (7771), फलटण 76 (27584), सातारा 192 (38183), वाई 29 (12173) व इतर 12 (1196) असे आज अखेर एकूण 182000 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

Corona Positive

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 1(185), कराड 4 (730), खंडाळा 2(146), खटाव 3 (455), कोरेगांव 5 (362), माण 0(245), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (174), फलटण 0 (273), सातारा 12 (1160), वाई 0(320) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4094 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here