सातारा तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या फोटो नसलेल्या मतदारांची यादी www.nic.satara.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे असल्याचे कळविण्यात आले आहे.

सातारा : एक जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या (voter list) निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कुटंबातील दुबार,मयत,स्थलांतरीत मतदारांची (voter) नावे कमी करणे, कृष्णध्वल छायाचित्राऐवजी रंगीत फोटो (छायाचित्र) घेणे, नाव, लिंग, वय, पत्ता, रंगीत फोटो, याची माहिती घेऊन दुरुस्ती करणे या अनुषंगाने सर्व कामकाज केलेले आहे. परंतू या मोहिमे अंतर्गत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो प्राप्त न झालेने मतदार स्थलांतरीत झालेत की अन्य काय याची खातरजमा करता येत नाही. परिणामी फोटो नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. (satara-marathi-news-inclusion-of-photo-neccessary-in-voter-list)

मुल्ला म्हणाले मतदार यादीच्या छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान 15 जानेवारी 2021 ला प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव आहे परंतू फोटो नाही असे सातारा मतदारसंघातील सातारा तालुक्यामध्ये 12354 मतदार आहेत. त्यापैकी 611 मतदारांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. उर्वरीत 11743 मतदारांचे फोटो कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.

Also Read: धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे फोटो संकलित करण्याचे काम सुरु आहे. अनेक वेळा सुचना देऊनही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे फोटो जमा होत नाहीत. परिणामी संबंधित मतदार हे त्या यादी भागात राहात नसल्याचे प्राथमिक निदर्शनास दिसून येत आहे. त्यामुळे फोटो संकलित करणे शक्य होत नाही. तरी अशा सर्व मतदारांनी स्वत:चे फोटो नमुना 8 भरुन आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसिल कार्यालय सातारा निवडणूक शाखा यांच्याकडे जमा करावा असे आवाहन करण्यात आले हाेते. परंतु अद्यापही फोटो जमा झालेले नसल्याने मतदार यादी भागात राहत नसल्याचे दिसून येत आहे.

Also Read: पळशीत बैलगाडी शर्यत घेणाऱ्या 13 जणांवर गुन्हा; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

election

राज्याच्या आयुक्तांनी मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम 1960 मधील नियम 13 (2) नुसार विधानसभा मतदार यादीत नाव असलेला कोणताही मतदार त्या संबंधीत विधानसभा मतदार यादीतील नाव नोंदणीस नमुना 7 भरून आक्षेप नोंदवू शकतो.

सातारा तहसिल कार्यालय येथे फोटो नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम सुरू आहे. तरी कोणाचाही काही आक्षेप असल्यास तातडीने कळविण्यात यावे असे आवाहन प्रांताधिकारी मिनाज मूल्ला यांनी केले आहे. सातारा तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या फोटो नसलेल्या मतदारांची यादी www.nic.satara.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे असल्याचे कळविण्यात आले आहे.

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here