जळगाव : शहराजवळील आसोदा गावातील छत्तीस वर्षीय युवकाच्या दुचाकीला निलगायीने धडक दिल्याची घटना मध्यरात्री घडली. या अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना पहाटे सहा वाजता सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (young-man-dies-in-two-wheeler-accident)
Also Read: ‘जीआय’ मानांकित केळी प्रथमच अरब देशात !
आसोदा गावातील रहिवासी श्याम शांताराम कोळी (वय-३६) हा तरूण आईवडील, पत्नी व दोन मुलांसह मोलमजूरी करून राहतो. सोमवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मित्राची दुचाकी घेवून कामानिमित्त गावा बाहेर आला. त्यावेळी शेळगाव-आसोदा रस्त्यावर एका शेतातून अचानक निलगाय रस्त्यावर येवून श्याम कोळी यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात श्याम कोळी दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्रभर तेथेच पडून राहिल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
Also Read: दहा हजार ऑक्सिजन सिलिंडरची रोज होणार निर्मिती
शेतात जातांना दिसली घटना
आज मंगळवारी सकाळी ६ वाजता काही शेतकरी आपल्या शेतात शेळगाव-आसोदा रस्त्याने जात असतांना रस्त्यालगत अपघात झाल्याचे दिसून आले. श्याम कोळी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

कुटूंबाचा आधारच गेला
मयताच्या पश्चात आई कलाबाई, वडील शांताराम रामदास कोळी, पत्नी सीमा, मुलगा हेमंत आणि मुलगी वैष्णवी असा परिवार आहे. मयत श्याम कोळीचे वडील आसोदा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला आहे. एकुलता एक मुलगा केल्याने आईवडीलांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Esakal