

शरीराला फिट ठेवण्यासाठी थोडा वर्कआऊट सुद्धा गरजेचा असतो. लग्नाच्या आधी फिट होण्यासाठी कमीत कमी 1 तास वर्कआऊट जरूर करा. यासाठी तुम्ही वॉकिंग किंवा जॉगिंगला आपल्या फिटनेस रूटीनमध्ये सहभागी करू शकता.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दिवसभरात कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी प्या. त्याच्याबरोबर सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्यात लिंबू मिक्स करून प्या. किंवा लिंबू च्या पाण्यामध्येमध्ये मध मिक्स करून तो घेऊ शकता. जे तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करेल.

डायटमध्ये हिरव्या भाज्या फळे आणि व्हिटॅमिन सी चा समावेश करा. शक्य तितक्या आहारात प्रोटीन युक्त आहार जसं की पनीर ,डाळ ,दूध, अंडी यांचा समावेश करा. आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे शरीराला प्रोटीन देखील मिळेल आणि शरीर फिट राहील.

रात्रीचे जेवण लवकर खा:
झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 तास आधी आपण जेवले पाहिजे. रात्री जेवण पचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त हलका आहाराचा समावेश करा. शक्य असेल तर रात्री 7 वाजेपर्यंत डिनर करून घ्या.

डायटिशियनचा योग्य सल्ला घ्या:
तुम्ही तुमच्या हेल्दी आणि चांगल्या डायट साठी कोणत्याही डायटेशनचा सल्ला घेऊ शकता. जर तुमच्या जवळ जास्त वेळ नाही आहे .तर कोणत्याही एक्सपर्ट चा सल्ला घेऊन तुम्ही त्याचा डायट मध्ये वापर करू शकता.

हाय कॅलरीज करा बाय:
हाय कॅलरीज खाऊ नका .शिवाय जंक फूड देखील टाळा. तुम्ही तुमच्या डायटमध्ये फळांचा वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला खूप भूक लागेल तेव्हा फळ खावा. यामुळे तुमची भूक कंट्रोल होईल आणि शरीरात जास्त कॅलरीज पण वाढणार नाहीत.

लग्नाच्या काही महिने आधीच तुम्हाला डाइट घेऊन सतर्क राहिले पाहिजे. साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ ,जास्त मीठ, अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.यामुळे वजन कमी राहील. शिवाय शरीरात पाणी एकत्र साठणार नाही. लग्नाच्या दिवशी तुम्ही खूप सुंदर आणि फिट दिसाल.

तुम्हाला तुमच्या डायटमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीचा समावेश केला पाहिजे. जे तुमच्या वजनाला कमी करण्यास मदत करेल. जेवणाच्या आधी 30 मिनिट ग्रीन टी घ्या. ज्यामुळे तुमच्या शरीराची चयापचय वाढवते.

आपल्या डायटमध्ये मीठ आणि साखरेचा वापर कमी करा. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतात. त्याच्या ऐवजी रोज नारळाचे पाणी पिणे खूप फायद्याचे ठरेल. विटामिन सी चा वापर करा आणि ज्युस ऐवजी फळाचा वापर करा. कारण फळामध्ये फायबरची मात्रा खूप असते.

Esakal