मंडणगड(रत्नागिरी): रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला मंडणगड(mandangad) तालुका. हिरवळीचा नवा साज परिधान करून पावसाळी पर्यटनास सज्ज झाला आहे. पावसाळा आणि कोकणाचे एक अतूट नाते आहे. कोकण तसे बारमाही सुंदरच दिसते, पण त्याचे रूप सर्वांत खुलून येते ते पावसाळ्यातच. धुक्याची दुलई, हिरवंगार परिसर, उंच कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, लाल मातीच्या पायवाटा हे सर्वच मनाला भुरळ घालते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार शेतीमुळे तयार झालेले आल्हाददायक वातावरण, वाऱ्याच्या झुळकीवर हिरव्यागार लाटेचा भास करून देणारी भातशेती. हे सर्व कोकणातील गावांचे सौंदर्य वाढवत असून डोळ्यांना सुखावणारी दृश्य.कॅमेरात कैद केली आहेत आमचे सकाळचे मंडणगडचे बातमीदार सचिन माळी यांनी.(ratnagiri-mandangad-rain-tourism-update-marathi-news)




Esakal