छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. 2009 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेमधील अर्चना आणि मानव ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानवची तर अंकिता लोखंडेने आर्चनाची भूमिका साकारली होती. मालिकेला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर अभिनेता हितेन तेजवानीने मानवची भूमिका साकारली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा सिक्वल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मालिकेच्या कथेवर आणि स्क्रिप्टवर काम पूर्ण झाले असून ही मालिका बालाजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार असून ७ वर्षांनंतर अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर मालिकेतील इतर भूमिकांसाठी लवकरच कास्ट ठरवण्यात येईल.शाहीर शेख हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे.कुछ रंग प्यार के,ये रिश्ता है प्यार का, महाभारत या प्रसिद्ध मालिकांमध्ये शाहिरने काम केले आहे.