अत्यंत कम्फर्टेबल आणि कूल लूक देणारा कपड्यांचा प्रकार म्हणजे टी-शर्ट आणि जीन्स. त्यामुळेच कोणताही ऋतू असला तरीदेखील मुलं याच आऊटफिटला पसंती देतात. परंतु, आवड असण्यापेक्षा ते कपडे आपल्या शरीरयष्टीला किंवा प्रसंगाला साजेसे आहेत की नाही हेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच टी-शर्ट घालताना मुलांनी कोणती काळजी घ्यावी हे आज जाणून घेऊयात. तुम्ही खरेदी केलेल्या टी-शर्टचा रंग,त्याचं फॅब्रिक तुम्हाला सूट होतंय की नाही हे प्रथम चेक करा. आवडला म्हणून घेतला असं अजिबात करु नका.जर तुमची बॉडी परफेक्ट असेल तर तुम्हाला फिटींगचे टी शर्ट चांगले दिसतील. मात्र, तुम्ही अंगाने बारीक किंवा हेल्दी असाल तर फिट टी शर्ट वापरु नका. टी शर्ट कॅज्युअल वेअर असल्यामुळे लग्नकार्यात किंवा अन्य फॉर्मल ठिकाणी असे कपडे घालू नका.टी शर्टवर एखादं इंग्लिश किंवा अन्य भाषेत वाक्य लिहिलेलं असेल. तर, त्या वाक्यांचा अर्थ प्रथम समजून घ्या मगच अशा कपड्यांची खरेदी करा.टी शर्ट कायम जीन्सवरच खुलून दिसतो. त्यामुळे फॉर्मल पॅण्टवर तो चुकूनही घालू नका.