ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे स्वतंत्र पर्यटन महामंडळ निर्माण करता येईल का ? याचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्याबरोबरच मत्स्यदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांची संख्या निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास आढावा बैठकीत दिले. दोडामार्ग, वेंगुर्ले व सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालये चांगल्या दर्जाची सुरू करण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या मागील क्षेत्रामध्ये वन्य जीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना केली.
यावेळी उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तिलारी प्रकल्प क्षेत्रात पर्यटन विकासासाठी वन संवर्धन राखीव करून पर्यटनाच्या सुविधा उभारण्याबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करावा. एलईडी मासेमारी विरोधात येत्या अधिवेशनात राज्याचा कडक कायदा निर्माण केला जाईल. जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा आढावा संबंधित विभागांकडून घेऊन पदे भरण्याविषयीची कार्यवाही तातडीने सुरू करावी.
हेही वाचा- असा आहे मुख्यमंत्र्यांचा मंगळवारचा दौरा….
खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वनांची नोंद बदलता येत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यात येईल. आकारीपड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सम प्रमाणात वाटणी करण्यासाठी जिल्हाधिकारी
यांनी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि त्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा.कबुलायतदार गावकार प्रकरणी जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या ६५८ हेक्टर जमिनीबाबत एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात बांधण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे हे दगडी बांधण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव करावा.
हेही वाचा– …म्हणून चढला भास्कर जाधवांचा पारा
मुख्यमंत्र्यांनी दिल्या विविध सूचना
सागरी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाऐवजी कमी खर्चात टिकाऊ रस्ते निर्मितीसाठी बॅच मिक्सचा वापर करावा. रेडी व आरोंदा बंदर पुन्हा शासनाकडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल, पाणबुडी प्रकल्पाविषयी सकारात्मक विचार करू, जिल्ह्यात अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. कवी मंगेश पाडगावकर यांच्यासह अन्य स्मारकांच्या उभारणीबाबत प्रस्ताव द्यावेत. त्यामध्ये त्या व्यक्तीविशेषांचा समावेश राहील याची काळजी घ्यावी. महिनाभरात पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्याचा परिपूर्ण पर्यटन अराखडा सादर करावा अशा विविध सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा– वेळेच्या आधिच मुख्यमंत्री हजर : पत्रकारांना नाकारला प्रवेश…
कणकवली ट्रामा केअर लवकरच
कणकवली येथील प्रस्तावीत ट्रामा केअर सेंटर लवकरच सुरू होईल, असे सांगून जिल्ह्यातील व्हायरॉलॉजी लॅब एप्रिलपर्यंत सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. माकडतापाची नवी लस मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. वेंगुर्ला येथील उप जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिलमध्ये हे रुग्णालय सुरू होईल. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयासाठी लागणारा निधी देण्याची व्यवस्था तातडीने करावी. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम राहण्यासाठी आरोग्य सचिवांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
हेही वाचा– ब्रेकिंग – मुख्यमंत्र्यांसमोरच संतापले भास्कर जाधव ; खासदारांचा झटकला हात
रखडलेले प्रस्ताव मार्गी लावणार
जिल्ह्यातील अरुणा, नरडवे, सी वर्ल्ड सारखे रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लावू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांसाठी खासगी गुंतवणूकदार पुढे आल्यास त्यासाठी भांडवली अनुदान देऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवून प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. काजू व फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण ठरवावे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शिपायांना दिल्या बसण्याच्या सूचना
आढावा बैठक सुरू असताना शिपाई आणि इतर कर्मचारी हे सभागृहामध्ये बाजूला उभे होते. आढावा बैठक सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या सर्वांना खाली बसण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हे सर्व उपलब्ध जागेवर बाजूला बसले.पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर यांनी संगणकीय सादरीकरण केले. मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव अशिषकुमार सिंह, , प.दु.म. चे सचिव अनुकुमार प्रधान, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा– शेतकऱ्यांसाठी खुशखबर : लगेच आपले बॅक खाते चेक करा…
अधिकाऱ्यांची उडाली धांदल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी हजेरी लावली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. नियोजित वेळेच्या २० ते २५ मिनिटे अगोदर मुख्यमंत्री आढावा स्थळी दाखल झाल्याने अधिकारी वर्गाची चांगलीच धांदल उडाली आहे. ३.४५ वाजता नियोजित वेळ असताना ३.२० ला मुख्यमंत्री दाखल झाले.
यादीतील अधिकाऱ्यांना प्रवेश
या सभेला केवळ ८५ अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यात पत्रकारांचाही समावेश आहे. जिल्हा पोलिसांनी स्वतंत्र ओळखपत्रे दिली होती. पण बैठक सभागृहात प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी बनविण्यात आली होती. त्या यादीत नाव असलेल्या अधिकाऱ्यांना केवळ प्रवेश दिला जात होता. जिल्हा परिषदेच्या फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांनाच प्रवेश देण्यात आला. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाच्या खातेप्रमुखांना प्रवेश देण्यात आला.
हेही वाचा– Video : चक्क वाघ्या कुत्रा गळ्यातून काढतोय शंख ध्वनी…. –
प्रवेश नाकारल्याने पत्रकार नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील पत्रकारांना विशेष पास दिले आहेत. परंतु बैठक सभागृहात प्रवेश दिला गेला नाही. त्यांची पत्रकार परिषद नाही. तर पत्रकारांना देण्यात आलेल्या पासाचा उपयोग काय ? असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, उदय सामंत, अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता हे जिल्ह्यात येत असून यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा झाला.
कोकणवर विशेष प्रेम असणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतः उपस्थित राहत असल्याने जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. जिल्ह्याला स्वतंत्र पॅकेज मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे आढावा बैठकीत काय चर्चा होते ? हे समजन्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश अपेक्षित होता. माहिती कार्यालय याची बातमी काढणार असले तरी ती शासकीय भाषेत असणार आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समजण्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून करण्यात आली. तरीही प्रवेश नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्यालयातील हॉटेल केली बंद
मुख्यमंत्री ठाकरे येत असल्याने जिल्हा मुख्यालयातील हॉटेल व अन्य दुकाने दुपारी बंद करण्याचे आदेश पोलिसांनी व्यावसायिकांना दिले. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले. उद्या (ता.१८) सकाळी सुद्धा दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा– धक्कादायक-पाणी योजनेतच मुरतंय पाणी –
मच्छीमारांसाठी कर्जमाफीचा विचार
शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर मच्छीमारांना कर्जमाफी देण्याबाबत विचार आहे. मच्छिमारांबाबत सर्वेक्षण करून त्यांची वर्गवारी करावी. मच्छिमारांचे कर्ज कशा प्रकारचे आहे व किती आहे, कोणत्या गटातील मच्छिमार यासाठी पात्र ठरू शकतात, याची माहिती सादर करावी. याचा अभ्यास करून मच्छिमारांना कर्जमाफी जाहीर करू, असे आश्वासन श्री. ठाकरे यांनी दिले. सर्जेकोट, राजकोट, नवाबाग येथील जेटींची उभारणी करण्यासाठी मत्स्य विभागाने कार्यवाही पूर्ण करावी. मच्छिमारांच्या डिझेल अनुदानासाठी ५ कोटी ४० लाखांचा निधी लवकरच द्यावा, अशा सूचनाही श्री. ठाकरे यांनी दिल्या.

News Story Feeds