धो धो कोसळणार पाऊस, ढगांचा गडगडाट, हवेत जाणवणारा गारवा… अशा वेळी गरमा गरम फक्कड चहा आणि चटपटीत, तिखट वडापाव मिळाला तर….आहाहा! बाहेर पाऊस पडत असल्यावर असे गरमा गरम आणि तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ खाण्याची हौसच न्यारी! तुम्हालाही मॉन्सूनचा असा आनंद घ्यायला आवडतो का? मग तुमच्यासाठी मॉन्सून फुडचे आणखी काही पर्याय…नक्की ट्राय करा.
पाऊस आणि वडापाव हे समीकरण केव्हा जुळले कोणलाच माहित नाही पण, गरमा गरम वडापाव शिवाय पावसाची मज्जा नाही. पाऊस आणि चहा हे नुसत समीकरण नाही…प्रेमप्रकरण आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजत किंवा खिडकीत उभ राहून पावसाकडे पाहात चहा पिणे म्हणजे सुख!पाऊस आल्यावर जसा वडापावला लागतो तशीच कांदा भजी सुध्दा हवीच!
गरमा गरमा कांदा भजी, मिर्ची आणि चटणी…आहाहा! भजी म्हटल्यावर बटाटा भजीला विसरून कस चालेल. गरम गरम तेलातून काढलेल्या भजी आणि धो धो कोसळणारा पाऊस…..व्वा! नुसता विचार करुन तोंडाला पाणी सुटलं ना?पावसाळ्यात वडापावला उत्तम पर्याय म्हणजे तिखट समोसा, आंबट गोड चिंचेची चटणी मिळाली…तर अजून काय पाहीजे.खस्ता कचोरी, त्यावर तिखट – गोड चटणी आणि शेव…..हा पर्याय देखील तुम्ही पावसळ्यात ट्राय करु शकता. उपवास असो की नसो, पावसाळ्यात तुम्ही साबूदाणा वडा आणि काकडीची चटणी एकदा ट्राय कराच! खरपूस भाजलेलं मक्याचं कणीस नाही खाल्लं तर मग काय पावसाळ्या एन्जॉय केला. एकदा पावासात भिजल्यानंतर, थंडीत कुडकुडत भुट्टा ट्राय कराच….तुम्हाला मज्जा येईल.पावसळ्यात कधी गरमा गरम जिलेबी खाल्ली आहे…..नसेल केली तर एकदा खाऊन बघाच!
जिलेबी आवडत असेल इमरती, इंदौरी, रबडी-जिलेबी हे पर्याय देखील उत्तम!नॉनव्हेज खायला आवडत असेल तर पावसाळ्यात तंदुरी चिकन हा बेस्ट पर्याय ठरेल. गरम गरम कॉफीचे घोट घेत कोसळणाऱ्या पावसाची मज्जा काही वेगळी!