फलटण शहर (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असले तरी आगामी काळात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहुन योग्य नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी कोरोना आढावा व नियोजन बैठकीत दिल्या. लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी आयोजित नियोजन व आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Speaker Ramraje Naik-Nimbalkar Orders Government Not To Close Corona Treatment Centers In Rural Areas)

सध्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर्स, कोरोना उपचार केंद्र आज तेथे रुग्ण नाहीत म्हणून लगेच बंद करु नका, अशा सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या आहेत.

यावेळी आमदार दीपकराव चव्हाण (MLA Deepak Chavan), संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, अक्षय सोनवणे उपस्थित होते. दोनशे बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन कोणत्याही परिस्थितीत फलटणचे जम्बो कोरोना हॉस्पिटल अगामी पंधरा दिवसात उभे राहील असे नियोजन करा.

Also Read: नगरविकासमंत्र्यांनी चालवला ट्रॅक्टर, तर पालकमंत्र्यांची थेट शिवारात रपेट

CORONA

सध्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर्स (Corona Care Centers), कोरोना उपचार केंद्र आज तेथे रुग्ण नाहीत म्हणून लगेच बंद करु नका, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा विचार करता ही सर्व सेंटर्स बंद न करण्याचे निर्देश देतानाच खाजगी हॉस्पिटल्समध्ये (Private Hospital) सुरु करण्यात आलेली कोरोना उपचार व्यवस्था, निर्माण करण्यात आलेली जादा बेड व अन्य व्यवस्था तशीच सुरु ठेवण्याबाबत संबंधित खाजगी हॉस्पिटल्सना बैठक घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांची सर्व यंत्रणा तशीच सुरु ठेवण्याबाबत त्यांनाही माहिती द्या, असे निर्देशही रामराजेंनी दिले. कोणत्याही गावात सापडलेला बाधित व्यक्ती एकतर रुग्णालयात दाखल करा किंवा संस्थात्मक विलगीकरणात पाठवा, परंतु आता कोणीही गृह विलगीकरणात असणार नाही यासाठी विशेष खबरदारी घ्या, संस्थात्मक विलगीकरणात येण्यास कोणी नकार दिल्यास प्रसंगी पोलिसांची मदत घ्या, पण कोणीही गृह विलगीकरणात ठेवू नका, असेही रामराजेंनी सांगितले.

Also Read: शेरेत ‘माऊली’नं फुलवलं नंदनवन; पाच एकर जागेत तब्बल 400 वृक्षांची लागवड

कोरोना लसीकरण ही मोठी समस्या आहे, लस उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासन नियोजन करीत असल्याने राज्य शासन काहीच करु शकत नसल्याचे स्पष्ट करताना खाजगी करणातून १८ ते ४४ वयोगटातील दुकानदार, बेकरी, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सार्वजनिक व्यवस्थेतील वाहन चालक वगैरे विविध घटकातील लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने सर्वांचीच कुचंबना होत असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

Speaker Ramraje Naik-Nimbalkar Orders Government Not To Close Corona Treatment Centers In Rural Areas

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here