भारतीय महिला क्रिकेट संघ सात वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडमधील ब्रिस्टेलच्या मैदानात बुधवारपासून भारत आणि इंग्लंड महिला संघातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होतेय. 1976 पासून कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय महिला संघाचा हा आतापर्यंतचा 37 वा कसोटी सामना असेल. ब्रिस्टेलच्या मैदानात खेळताना भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्धचे आपले रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (mithali-raj-led-indian-women-team-to-face-england-women-in-test-match-at-bristol-know-head-to-head-records)

भारत आणि इंग्लंड महिला संघात आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 10 सामने ड्रॉ झाले असून दोन वेळा भारतीय महिलांनी बाजी मारलीये. इंग्लंड महिलांना एकमेव सामना जिंकता आला आहे. आपली हीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी मिताली राजचा संघ प्रयत्नशील असेल. इंग्लंडने 8 कसोटी सामन्यांची मेजवाणी केलीये. यात एकाही कसोटी सामन्यात भारतीय महिला संघ पराभूत झालेला नाही.

Also Read: WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

यापूर्वी झालेल्या तीन कसोटी सामन्यात भारतील महिला संघाने विजय मिळवलाय. ब्रिस्टेलची कसोटी जिंकून भारतीय महिला संघ विजयी चौकार खेचण्यासाठी उत्सुक असेल. ऑस्ट्रेलिया वगळता कोणत्याही संघाला सलग तीन कसोटी सामने जिंकता आलेले नाहीत. इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकून सलग चार विजयाचा विश्वविक्रम रचण्याची भारतीय महिलांना संधी आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केलाय. भारतीय संघाचा उप- कर्णधार अजिक्य रहाणेनं चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचे धडे मितालीच्या संघाला दिले आहेत. याचा देखील संघाला निश्चितच फायदा होईल. इंग्लंड महिला संघ सातत्यपूर्ण कसोटी सामने खेळत आहे. त्यांच्याकडे 95 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. दुसरीकडे अनियमित कसोटी सामने खेळलेल्या भारतीय महिला संघाने आतापर्यंत केवळ 36 कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाने सामने कमी खेळले असले तरी इंग्लंड विरुद्धची त्यांची कामगिरी लक्षवेधी अशीच आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here