नागपूर : विदर्भात सक्रिय असलेल्या मॉन्सूनने मंगळवारी उपराजधानीला जोरदार तडाखा दिला. दुपारच्या सुमारास अनेक भागांत धुवाधार पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. मॉन्सूनचा प्रभाव किंचित कमी झाला असला तरी, या आठवड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. अधूनमधून काळेकुट्ट ढग जमते. मात्र, दणक्याचा पाऊस पडत नाही. त्यामुळे नागपूरकरांची काहीही निराशा झाली आहे.(छायाचित्र – प्रतीक बारसागडे) (Heavy-rains-lashed-Nagpur-on-Tuesday)

यंदा मॉन्सूनच वेळेपूर्वीच आगमन झाल्याने बळीराजा खुश असून, पेरण्यांना सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आणखी चार-पाच दिवस विदर्भात येलो अलर्ट दिला असल्याने वरुणराजाचा मुक्काम किमान आठवडाभर राहणार आहे.
मंगळवारी शहरातील काही भागांतच वरुणराजा बरसला. दुपारी एक वाजेपर्यंत ऊन-सावल्यांचा खेळ चालला. त्यानंतर अचानक आभाळ भरून आले. दीडनंतर जवळपास अर्धा ते पाऊण तास शहरात विशेषतः उत्तर नागपुरातील गोधनी, झिंगाबाई टाकळी, मानकापूर या परिसरात धो-धो बरसला. शहरातील अन्य भागांत हलक्या सरी पडल्या.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. चंद्रपूर येथे सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अमरावती येथे ६३ मिलिमीटर आणि यवतमाळ येथे २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कमी अधिक प्रमाणात विदर्भात सगळीकडेच पाऊस सुरू आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here