कणकवली (सिंधुदूर्ग) : खासदार संजय राऊत यांनी नाणार प्रकल्पाची जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करून प्रकल्प योग्यच असल्याचे स्पष्ट केले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प प्रत्यक्ष कृती आणावा. त्यायोगे कोकण विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.
हेही वाचा- असा आहे मुख्यमंत्र्यांचा मंगळवारचा दौरा….
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत जठार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नाणार प्रकल्प होण्यासाठी मी आतापर्यंत अनेकवेळा मागणी केली. मात्र, शिवसेनेने या प्रकल्पाला कायमच विरोध केला. असे असताना नाणार प्रकल्प कसा चांगला आहे, ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झाले. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनातून घेतलेल्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करत आहोत.
हेही वाचा– शेतकऱ्यांसाठी खुशखबर : लगेच आपले बॅक खाते चेक करा…
जे जनतेला सांगितलेत, तेच करा
श्री.जठार म्हणाले, नकोसे असलेले हवेसे झाले. कारण या पूर्वी शिवसेना सत्तेत होती पण जबाबदारी नव्हती. आता सत्ता पण आहे व जबाबदारीही आली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार द्यावा लागणार आहे. अन्यथा बेरोजगारांना उत्तर द्यावे लागणार आहे. सामनामध्ये प्रसिद्ध झालेली नाणारबाबतची भूमिका म्हणजे या प्रकल्पाच्या विरोधावर यू-टर्न घेण्यापूर्वी शिवसेनेने सोडलेला एक फुगा आहे. शिवसेनेच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. मात्र, आता पुन्हा यू-टर्न घेऊ नका, सामनातील पहिल्या पानावर नाणारबाबत जे जनतेला सांगितलेत, तेच करा, असे आवाहन जठार यांनी केले आहे.

News Story Feeds