नाशिक : वेळ दुपारची…चेहेडी येथील दारणा नदीच्या पुलावर उभा भेदरलेल्या अवस्थेतील एक तरुण…कोण जाणे त्याच्या मनात काय सुरू होतं…पण तेथे उपस्थितांच्या भुवया तेव्हा उंचावल्या जेव्हा त्याने सांगितले कि….मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा…(youth-attempt-suicide-video-viral-nashik-marathi-news)

‘मी आत्महत्या करतोय.. माझी शूटिंग काढा’

या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास विकास विनायक लाखे (वय १९) रा. भोर मळा, सिन्नरफाटा, नाशिकरोड या तरुणाने मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा’ असे सांगत एका तरुणाने दारणा नदीच्या पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. उडी मारण्यासाठी तरुण पुलाच्या कठड्याला धरुन बराच वेळ लटकला होता. पण उडी मारत असताना ‘माझी शूटिंग काढा’ असे तो लोकांना ओरडून सांगत होता. काही वेळाने त्याने दोन्ही हात सोडून नदीतील पाण्यात उडी मारली.

बिटको रुग्णालयात दाखल

हा प्रकार पाहणार्‍या नागरिकांनी धावत जाऊन त्याला बाहेर काढले. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविताच बिट मार्शल आणि स्थानिकांच्या मदतीने युवकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here