धुळे : वनक्षेत्रातील (Forest area)चराईची जमीन मेंढपाळांना २९ जूनपर्यंत मिळावी. अन्यथा, ३० जूनला येथील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयात (Office of Forests) मेंढपाळ एकत्र येतील आणि चटावरचे श्राध्द उरकतील. आत्मक्लेष म्हणून काही मेंढपाळ मुंडण करतील. या आंदोलनानंतर (Movement) निर्णय घेतला नाही, तर मेंढपाळ १५ जुलैपासून उपवनसंरक्षक कार्यालयास टाळे ठोकतील, असा इशारा ठेलारी महासंघाने (Thelari Federation) दिला. (forest department warned to agitate for thelari federation)

Also Read: तीन महिन्यांपूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण; पोलिस विभागाचे कौतुक

यासंदर्भात ठेलारी महासंघाने उपवनसंरक्षक एम. एस. भोसले यांना निवेदन दिले. त्यात जिल्ह्यातील माळमाथा परिसरात मेंढपाळ मोठ्या संख्येने स्थिरावले आहेत. वर्षानुवर्षे धनगर समाज त्यांच्याकडील मेंढ्या चारण्यासाठी वनक्षेत्राचा उपयोग करतात. मेंढ्या चारण्यासाठी वनक्षेत्र निर्धारित करून द्यावे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली. जिल्ह्यातील ठेलारी महासंघाने जून २०१९ मध्ये आठ दिवस उपोषण केले. त्यावेळी उपवनसंरक्षकांनी लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित केले. परंतु, आता दोन वर्ष होत आली तरीही कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
आता पुन्हा उपवनसंरक्षक कार्यालयास त्यांच्याच लेखी आश्वासनाची जाणीव करून देण्यात आली होती. खुलासा केला नाही, तर आंदोलन करू, असे सांगितले होते.

Also Read: अर्धा जून संपूनही पेरणीयुक्त पाऊस नाही; शेतकरी म्हणताहेत गेला पाऊस कुणीकडे

आंदोलनाचा इशारा

त्यानुसार उपवनसंरक्षक कार्यालयालगत निदर्शने करीत महासंघाने निवेदन दिले. जिल्ह्यातील मेंढपाळांनी पाच ऑक्टोबर २०२० ला धुळ्यात बिऱ्हाड मोर्चा काढला होता. त्याची दखल घेतली नाही म्हणून ५ मे २०२० पर्यंत पुन्हा जाणीव करून दिली. लवकरच जमीन दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. पण, त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता धनगर समाज संतप्त झाला आहे. हक्काचे वनचराई क्षेत्र १५ दिवसांत न दिल्यास मेंढपाळ ३० जूनला येथे श्राद्धासह मुंडणाचा कार्यक्रम करत निषेध आंदोलन करतील, असे शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, पंकज मारनर, ज्ञानेश्वर सुळे, गोविंदा रूपनर, समाधान ठोंबरे आदींनी निवेदनात म्हटले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here