मल्हारपेठ (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काेराेनाचे (coronavirus) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोना बाधितांच्या (covid19 patients) संख्येचा आलेख कमी- जास्त होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात मंगळवारी एक हजार ५८७ रुग्ण बरे झाले असून, ८३२ कोरोनाबाधित व २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवशी बुद्रुक येथील वाढती कोरोनाची साखळी (covid19 patients chain) रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने (divashi grampanchayat) दहा दिवसांचा कडक लॉकडाउन (lockdown) करण्याचा निर्धार केला आहे. (satara-news-divashi-budruak-lockdown-22-june-covid19)
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दिवसेंदिवस वाढणारी बाधित रुग्णांची साखळी तुटताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात नियंत्रणात आला असून, जिल्ह्यातील गृह विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण कमी होताना आढळून येत आहे. परंतु अद्यापही काही भागात रुग्ण संख्या वाढतच आहे.
Also Read: चिमुकल्यांच्या अस्तित्वाविना शाळा साऱ्या सुन्या-सुन्या; पाहा फोटो
दिवशी बुद्रुक येथील वाढती कोरोनाची साखळी रोखण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दिवशी बुद्रुकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावाची वाटचाल हॉटस्पॉटकडे होण्याच्या मार्गावर आहे. गावांमध्ये २२ जूनपर्यंत दहा दिवसांचा कडक लॉकडाउन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किराणा दुकाने, चिकन, दूध संकलन केंद्र, पिठाच्या गिरणी, सलून आदी व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. लोकांनीही विनाकारण घराबाहेर पडणे टाळले आहे.
Also Read: ‘कृष्णा’च्या पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचा कस लागणार?

Also Read: बेलवडे बुद्रुक, करपेवाडीवर शाेककळा; साेमवार ठरला घात वार
मंगळवार (ता.15) अखेरचे कोरोना अपडेट्स…
एकूण नमुने : ९,२७,४५१
एकूण बाधित : १,८२,०००
घरी सोडण्यात आलेले रुग्ण : १,६९,५९६
उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण : ४,०९४
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : ८,५१२
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
Esakal