शिंदखेडा : कोरोनामुळे (corona) अनाथ झालेल्या महाराष्ट्रातील ७०० मुला-मुलींचे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, राहणे, जेवण, औषधी व डॉक्टरासह (Doctor) पालनपोषणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने (indian Jain Association) स्वीकारल्याची माहिती संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांनी ऑनलाइन बैठकीत दिली. त्या अनुषंगाने राज्याध्यक्ष हस्तीमल बंब, राज्य प्रभारी नंदकिशोर साखला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांमार्फत माहिती व अर्ज गोळा करण्यात येत आहेत. (seven hundred children orphaned by corona will get free education)
Also Read: तीन महिन्यांपूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण; पोलिस विभागाचे कौतुक
कोरोनामुळे अनाथ झालेल्या हजारो विद्यार्थी सध्या प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन पालकांची भेट घेऊन संमतीने अर्ज घेण्यात येतील. त्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक संकुलात मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येईल. तूर्तास या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन होईल. शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर त्यांना वाघोली शैक्षणिक संकुलात पाठविण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण
प्रत्येक जिल्ह्यात या अभियानासाठी राज्याध्यक्ष बंब यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष हरकचंद बोरा, दीपक चोपडा, नाशिक विभागप्रमुख विजय दुग्गड, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा, हरीश चोरडिया, विनय पारख, विभाग अध्यक्ष तुषार बाफना, धुळे जिल्हाध्यक्ष नवनीत राखेचा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भवरलाल कोचर, जळगाव जिल्हाध्यक्ष विजय जैन आदी परिश्रम घेत आहेत.
Also Read: धुळे जि.पतील वैयक्तिक मान्यतेच्या सर्वच आदेशांना स्थगिती

यांच्याशी साधा संपर्क
नाशिक विभागातील गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व अर्ज भरून द्यावेत. त्यासाठी विजय दुग्गड (९८२३१६३४४७) व प्रा. चंद्रकांत डागा (९४२२७६४९०६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
Esakal