बॉलिवूडचे डिस्को डान्सर अर्थात मिथुन चक्रवर्ती यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. १९५० साली बांग्लादेशमध्ये मिथुन यांचा जन्म झाला होता.त्यानंतर त्यांचे कुटुंब बांग्लादेशमधून भारतात आले.अभिनय क्षेत्रात येण्याआधी मिथुन दा हे एका नक्षलवादी समूहात काम करत होते. त्यावेळी एका अपघातात मिथुन यांच्या भावाचं निधन झालं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मिथुन यांच्यावर आली. त्यानंतर त्यांनी नक्षलवाद सोडला.कोलकत्ता इथं केमिस्ट्रीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये (FTI) त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. १९७६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटामधून मिथुन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या डान्सच्या स्टाईलने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. हिंदी, बंगाली, हिंदी, भोजपुरी,तेलुगू, कन्नड़ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये मिथुन यांनी काम केले.
मिथुन यांच्या तेरे प्यार में, प्रेम विवाह, हम पांच, डिस्को डांसर, हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथ, तितली या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.