कळमसरे (ता.अमळनेर) : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत (Rural Development and Panchayat Raj Department) राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत (Mahaawas Abhiyan Yojana) हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या अमळनेर तालुक्यातील 800 लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत झाला. पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते शांताबाई निकम रा.कळमसरे यांना प्रातिनिधीक स्वरुपात घराची चावी देण्यात आली.( home entry for eight hundred people under mahawas abhiyan)

Also Read: कर्ज काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रकल्प अधिकारी गजाआड

Hoom

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. अमळनेर पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मा.उपसभापती शाम अहिरे, पं.स.सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, कक्ष अधिकारी के.डी.पाटील, समाजसेवक दिपक पाटील, अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह लाभार्थी इंदुबाई पाटील (निम), अशोक पाटील (निम), नंदु राठोड (सारबेटे खु), प्रविण कोळी(जैतपीर) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

Also Read: कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांचे होणार मोफत शिक्षण

तालुक्यात आठशे नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण

तालुक्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत तालुक्यातील 800 नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. आज झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे वेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 लाभार्थ्यांना घराच्या किल्ल्या (चावी) देण्यात आल्या.महाआवास अभियानाअंतर्गत अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 450 घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण 350 लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here