तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत किंवा फ्रेंड्ससोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय. तर एकदा दिल्लीतील प्रमुख म्युझियमला भेट देऊ शकता. त्या म्युझियममधील अनेक मनोरंजक गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतील.

तुम्हाला जर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन व तत्त्वज्ञान मुलांना शिकवायचे असेल तर एकदा तुम्ही नॅशनल गांधी म्युझियमला गेलेच पाहिजे.

दिल्लीत किशोर मुर्ती भवन जवळील नेहरू तारा मंडळ हे दिल्लीतील सर्वात लोकप्रिय म्युझियमपैकी एक आहे. तुम्ही येथील स्काय थेइटर मुलांसमवेत संपूर्ण (ब्रह्मांड) विश्वाच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

मादाम तुसाद म्युझियममध्ये बॉलिवूडपासून देशातील अनेक बडे नेते आणि खेळाडूंपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या मेणाचे पुतळे आहेत.

दिल्लीच्या चाणक्य पुरी भागात असलेल्या या म्युझियममध्ये तुम्हाला डिझेल इंजिन व कोळसा इंजिनमधून आधुनिक भारतीय ट्रेनविषयी मनोरंजक गोष्टी जाणून घेता येतील.

असे म्हणतात की या म्युझियममध्ये 65 हजाराहून अधिक प्रकारच्या (डॉल) बाहुल्या आहेत, हे म्युझियम दिल्लीच्या बाराखंबा रोडवर आहे.
Esakal