सुदैवाने बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी घरात शिरले नाही.
गुहागर (रत्नागिरी ) : तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. बुधवारी सकाळपर्यंत पडणाऱ्या पावसाने अनेकांची झोप उडवली. (heavy rains lashed guhagar taluka on wednesday morning)
Also Read: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; तेरेखोल नदी पातळीत वाढ

पालशेत येथील बाजारपुलावरुन पहाटे चारच्या दरम्यान पाणी वाहू लागले. सकाळी 9 वाजेपर्यंत पाण्याचा वेग प्रचंड असल्याने वाहतूक खोळंबली होती. पालशेत मच्छीमार्केट परिसरही पाण्याखाली गेला होता. गुहागर शहरातील साखवी परिसरातील घरापर्यंत पाणी पोचले. खालपाट परिसरातही काही घरांच्या अंगणापर्यंत नाल्याचे पाणी पोचले होते. सुदैवाने बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी घरात शिरले नाही.
Also Read: बाधित सापडण्यात रत्नागिरी राज्यात दुसर्या क्रमांकावर

मुसळधार पडलेल्या पावसामुळे आबलोली येथील एका गोठ्याचे नुकसान झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीप्रमाणे गुहागर मंडलात 130 मिलिमिटर, पाटपन्हाळे व हेदवी मंडलात 106 मिलीमिटर आबलोली मंडलात 100 तर तळवली मंडलात 105 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यापासून 16 जूनपर्यंतची ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. (heavy rains lashed guhagar taluka on wednesday morning)
Esakal