छोट्या पडद्यावरील विशेष लोकप्रियता मिळवणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेमधील अनिरूद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांच्या या मालिकेमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आज त्यांचा 55 वाढदिवस आहे.मिलिंद यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.मिलिंद यांचा जन्म 16 जून 1966 रोजी मुंबई येथे झाला.हम ‘बच्चे हिंदुस्थान के’ या चित्रपटामध्ये मिलिंद यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. अभिनयासोबतच त्यांना फोटोग्राफीची देखील आवड आहे.‘हा खेळ नशिबाचा’,’हक्क’, ‘पारख’, ‘ठण ठण गोपाल’,’मराठा बटालियन’, ‘देवकी’ या चित्रपटांमध्ये मिलिंद यांनी काम केले.