मुंबई – बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता (bollywood actress neena gupyta) यांचे आत्मचरित्र सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आता त्यांच्या आत्मचरित्राविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. नीना गुप्ता गेल्या आठवडाभरापासून आपल्या आत्मचरित्रातील वेगवेगळ्या घटना सोशल मीडियावर शेअर (post on social media) करत आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या चर्चेचा विषयही झाला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये बॉलीवूडशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. (neena gupta autobirography sach kahun toh reveals mother tried to end her life )

‘सच कहु तो’ (such kahun toh) या नावाचं आत्मचरित्र सध्या प्रसिध्द झाले आहे. त्यात नीना गुप्ता यांनी आपल्या चाहत्यांना वादळी आयुष्याची गोष्ट सांगितली आहे. वैयक्तिक गोष्टींचा खुलासा करुन त्या जगासमोर आणण्यास त्यांनी कुठल्याही प्रकारची माघारही घेतलेली नाही. त्यामुळे हे आत्मचरित्र सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. यात नीना गुप्ता यांनी सांगितले आहे, एकेकाळी माझ्या आईनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझी शकुंतला ही एक पंजाबी मुलगी होती. तिला तिच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.

neena gupta

तिन त्यावेळी आंतरजातीय विवाह केला होता. माझ्या वडिलांनी त्यावेळी एकच साहस दाखवलं ते म्हणजे त्यांनी त्यांना आवडणा-या मुलीशी विवाह केला होता. ती म्हणजे माझी आई होती. माझ्या आईवर त्यांचे खूप प्रेमही होते. मात्र त्यांनी आपल्या समाजातील मुलीशी लग्न केले नाही म्हणून समाजातील अनेकजणं त्यांच्यावर नाराजही होते. जेव्हा वडिलांच्या वडिलांनी त्यांना आपल्या समाजातील मुलीशी लग्न करण्याचा आग्रह त्यांना केला तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला नाही.

Also Read: आई कुठे काय करते: अनिरुद्धबद्दल जाणून घ्या खास गोष्टी

Also Read: ‘अभिनेत्याला जामीन मिळतो, मग आसाराम बापूंना का नाही’ ? भक्त चिडले

वडिलांच्या या निर्णयामुळे मात्र आई हादरुन गेली. वडिलांनी तिचा विश्वासघात केला होता. त्यामुळे तिनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णयही घेतला होता. ब-याच दिवसांनंतर मला कळले की, माझे वडिल रात्री घरी उशिरा का यायचे ते, माझे वडिल नेहमीच दोन परिवारांमध्ये फसत गेले. त्यांना दुस-या पत्नीपासून दोन मुलेही झाली. माझं लग्न ज्यावेळी ठरायचे ते काही कारणानं मोडायचे. त्याचे कारण काय होतं. हे मला तेव्हा कळलं. असंही नीना आपल्या आत्मचरित्रात नमुद करतात.



Esakal

45 COMMENTS

  1. buying prescription drugs in mexico [url=https://mexicanpharmacy.guru/#]buying prescription drugs in mexico online[/url] mexican mail order pharmacies

  2. how can i get mobic prices [url=https://mobic.store/#]can i purchase generic mobic online[/url] where can i get cheap mobic for sale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here