जगात अनेक मोठ-मोठी मंदिरे आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या

अक्षरधाम मंदिर – दिल्लीतील अक्षरधाम जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. जवळपास दोन लाख ४० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या मंदिराला स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर ही म्हटले जाते.
अंगकोर वट मंदिर – अंगकोर वट मंदिर कंबोडिया देशात आहे. हे मंदिर जवळपास १६२.६ हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारले असून ते जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा सूर्यवरमान द्वितीयने बांधले होते.
बेलूर मठ मंदिर – जवळपास १ लाख ६० हजार चौरस किलोमीटरवर विस्तारलेले हे मंदिर हावडा शहरात आहे. या मंदिराची उभारणी स्वामी विवेकानंद यांनी केली आहे.
बेसकिह मंदिर – इंडोनेशियाच्या बाली शहरात बेसकिह मंदिर आहे. जवळपास दोन लाख चौरसकिलोमीटर क्षेत्रफळावर सदरील मंदिर विस्तारले आहे. या मंदिर परिसरात इतर २३ मंदिरे आहेत.
छतरपूर मंदिर – देशाची राजधानी दिल्लीतील छतरपूर मंदिर जवळपास २ लाख ८० हजार चौरस किलोमीटरवर क्षेत्रफळावर विस्तारले आहे. येथे हिंदू धर्मातील प्रत्येक देव-देवतांच्या मूर्त्या आहेत.
श्री रंगनाथस्वामी मंदिर –
जवळपास ६ लाख ३१ हजार चौरसकिलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या रंगनाथस्वामी मंदिर भारतातील तिरुचिरापल्ली शहरात आहे.
स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर – अमेरिकेत न्यू जर्सी शहरातील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर जवळपास ६६ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारले आहे.
थिल्लाई नटराज मंदिर – तामिळनाडूच्या चिदंबरम शहरात हे मंदिर असून ते जवळपास १ लाख ६० हजार क्षेत्रफळावर विस्तारले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here