अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीसोबतच आणखी एक व्यक्ती दिसून येत आहे. फोटोत त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी तो ओरहान अवतारमणी असल्याचं म्हटलं जातंय.
समुद्रकिनारी बिकिनी परिधान केलेल्या जान्हवीचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मनिष मल्होत्रा, आकांक्षा रंजन कपूर, अक्षत रजन यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
याआधी मालदीव व्हेकेशनचेही जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते