यवतमाळ : कोरोनाच्या (coronavirus) भीतीने बाधितांसह नातेवाइकांना शेजारी व जवळच्या व्यक्तींकडून आवश्यक ती मदत वेळेवर मिळाली नसल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, अशा बिकटस्थितीतही दाखल रुग्णांच्या दोनशे नातेवाइकांना (Meals for two hundred relatives) दररोज माणुसकीचा घास भरविण्याचे सेवाकार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४६ दिवसांपासून (Service for 146 days) अविरत केले जात आहे. (Free-meals-for-relatives-of-coroan-patients-in-Yavatmal-for-146-days)

दीड वर्षांपासून कोरोनाने जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या विषाणूने आतापर्यंत असंख्य जणांचे आई-वडील, मुले-मुली, सून, जावई, नातवंडे अशी जवळची व्यक्ती हिरावून नेली आहेत. त्यातून अनेक चिमुकले व वयाने ज्येष्ठ असलेली व्यक्ती पोरके व निराधार झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातच तब्बल २१७ बालकांनी या कोरोनात पालकांना गमावले आहे. एकूण १६२ मुलांनी वडील गमावले असून, ५१ मुलांनी आई गमावली आहे. तर चार मुलांनी आई व वडील या दोघांनाही गमावले आहे. अशी भयावह परिस्थिती कोरोनाने निर्माण केली आहे.

Also Read: धोका वाढला! ‘मेडिकल’च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

अशा बिकटस्थितीत उपचारार्थ दाखल आपल्या जवळच्या व्यक्तींच्या काळजीत यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयाबाहेर राहणाऱ्या गरजूंना जेवण व मानसिक आधार देण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते १४६ दिवसांपासून अविरत करीत आहेत. विद्यार्थी परिषद व माधुरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून ही निःशुल्क सेवा कोरोनाच्या नियमांचे पालन करीत केली जात आहे.

(Free-meals-for-relatives-of-coroan-patients-in-Yavatmal-for-146-days)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here