प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकर तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे नेहमी मनेरंजन करत असते. तिच्या गाण्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.आर्याचा जन्म 16 जून 1994 रोजी नागपूरमध्ये झाला.आर्याची आई श्रुती आंबेकर देखील गायिका आहेत. आर्याने आपल्या आईकडूनच सुरांचे धडे घेतले. आर्याची आई हीच तिची पहिली गुरू आहे. याशिवाय आर्याची आजी देखील गायिकाच होत्या. आर्या केवळ 2 ते 3 वर्षांची असतानाच तिच्यातील सूर तिच्या कुटुंबियांनी ओळखले होते.2008 साली तिने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये आर्या शेवटच्या फेरी पर्यंत गेली. या शोमुळेच आर्याला खरी ओळख मिळाली.त्यानंतर आर्याने अनेक मालिकांचे शीर्षकगीते गायली. तसेच चित्रपटांमधील गाणी तिने गायली. 2017 साली आर्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तिने अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान या प्रसिद्ध कलाकांसोबत काम केले. लवकरच आर्या ‘रंगीला रे’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.‘दिल दोस्ती दुनिया दारी’,’तुला पाहते रे’,’आई कुठे काय करते’,’अग्ग बाई सासू बाई’,’माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकांच्या शिर्षकगीते आर्याने गायली आहेत. ‘कितीदा नव्याने’, ‘टिपूर चांदणे’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे, ‘जरा जरा’ या आर्याच्या गाण्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.