UEFA Euro 2020 Turkey vs Wales : युरो कप स्पर्धेतील ग्रुप -A मधील तिसऱ्या सामन्यात वेल्सने तुर्कीला 2-0 असे पराभूत केले. स्पर्धेतील वेल्सचा हा पहिला विजय ठरला. बाकूच्या स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मिडफिल्डर आरोन रामसी आणि डिफेंडर कॉनोर रॉबर्ट्सने केलेल्या गोलच्या जोरावर वेल्सने विजयाचा आनंद साजरा केला. आतापर्यंत वेल्स आणि तुर्की यांच्यात तीन सामने खेळले गेले. यात दुसऱ्यांदा वेल्सने बाजी मारलीये. (UEFA Euro 2020 Turkey vs Wales Ramsey Roberts seal 2-0 win for Wales over Turkey)
सामन्यातील पहिला गोल रामसीने 42 व्या मिनिटाला डागला. या गोलमुळे वेल्सच्या संघाला सामन्यात हाफ टाईमपूर्वीच 1-0 अशी आघाडी मिळाली. ही आघाडी अखेरच्या 90 मिनिटांपर्यंत कायम ठेवण्यात वेल्स संघाने यश मिळवले. एवढेच नाही तरी इंज्युरी टाईममध्ये 5 मिनिटे अतिरिक्त मिळाल्यावर डिफेंडर कॉनोर रॉबर्ट्सने तुर्कीवर हल्लाबोल करत आणखी एक गोल डागला. दोन्ही गोल करण्यात वेल्सचा कर्णधार गॅरथ बेल याने हातभार लावला. त्याने दोन्ही गोल असिस्ट करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Also Read: WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय
रामसीच्या नावे मोठा विक्रम
पहिला गोल डागून वेल्सला आघाडी मिळवून देणाऱ्या रामसीच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. सलग दोन युरो मॅचेसमध्ये त्याने गोल डागण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा वेल्सचा तो पहिला खेळाडू ठरलाय.
वेल्सचा मूरे दुखापतग्रस्त
73 व्या मिनिटात वेल्सचा फॉरवर्ड कीफर मूरेला दुखापत झाली. तुर्कीचा डिफेंडर कॅगलर सोयुन्कुची लाथ त्याच्या नाकावर लागली. नाकातून रक्त आल्याने उपचारासाठी काही वेळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर मूरे खेळल्याचेही पाहायला मिळाले.
Esakal