UEFA Euro 2020 Italy vs Switzerland : युरो कप स्पर्धेतील A ग्रुप चौथ्या लढतीत इटलीने स्वित्झर्लंडचा धुव्वा उडवला. रोममधील स्टेडियमवर घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात 3-0 असा विजय नोंदवत इटलीने स्पर्धेतील पुढचा प्रवास सुकर केलाय. इटालियन मिडफिल्डर मॅनुअल लोकेटेलीने 26 व्या मिनिटाला पहिला गोल डागत संघाल 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये इटलीने ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमधी खेळाला सुरुवात झाल्यानंतर 52 व्या मिनिटाला मॅनुअर लोकेटेलीनेच दुसरा गोल डागत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. पहिल्यांदाच मॅनुअल लोकेटेलीने आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका सामन्यात दोन गोल डागले. सामन्यातील 89 व्या मिनिटाला सिरो इमोबिले याने आपला पहिला आणि संघासाठी तिसरा गोल डागला.

Also Read: WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय
स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी स्वित्झर्लंडला या सामन्यात विजयाची गरज होती. पण आता त्यांचे समीकरण बिघडले आहे. दुसरीकडे घरच्या मैदानातील दिमाखदार खेळीने इटलीने बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. इटलीने सलामीच्या सामन्यात तुर्कीला 3-0 असे पराभूत केले होते. स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयासह इटलीने अखेरच्या 16 मधील आपले स्थान पक्के केले.

इटलीच्या संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळाचा नजराणा पेश केला. सातत्याने स्वित्झर्लंडच्या गोलपोस्टवर आक्रमण करताना 19 व्या मिनिटाला इटलीचा कर्णधार जॉर्जियो कॅलिनी याने पहिला गोल केला होता. पण रेफ्रीने हँडबॉल कॉल दिल्याने हा गोल नाकारण्यात आला. त्यानंतर काही मिनिटात डोमेनिको बेरार्डीच्या असिस्टवर 26 व्या मिनिटाला मिडफिल्डर मॅनुअलने इटलीसाठी पहिला गोल नोंदवला. पहिल्या सामन्यातील तीन गोल आणि त्यानंतर पुन्हा ट्रिपल धमाका करत इटलीने युरोत हिरोगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेतच इतर संघांना दिले आहेत.
Esakal