पुणे – आयटी, आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा), बीएफएसआय (बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा), फिनटेक (वित्त आणि तंत्रज्ञान), आर अॅण्ड डी (संशोधन आणि विकास) आणि उत्पादन अशा विविध क्षेत्रांना आवश्‍यक असलेल्या सुविधा पुण्यात (Pune) असल्याने गुंतवणूकदारांची (Investment) पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरात गेल्या पाच वर्षांत (२०१५ ते २०२०) नऊ हजार ६०० कोटी रुपयांची संस्थात्मक गुंतवणूक झाली आहे. ‘जॉन्स लॅग लसान’ने (जेएलएल) तयार केलेल्या रिअल इस्टेट इन पोस्ट पँडेमिक पुणे-अपॉर्च्युनिटी इन द मेकिंग’ या अहवालात शहरातील ही गुंतवणूक व त्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरत आहेत, हे नमूद केले आहे. (Pune has the Highest Investment for Office Space in the Last Five Years)

रिकाम्या जागांचे प्रमाण पाच टक्के

२०१८-१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६.४ ते ६.५ दशलक्ष चौरस फूट जागा भाडे तत्त्वावर दिली आहे. २०२० चा अपवाद वगळता पुण्यात दरवर्षी पाच दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने दिली गेली आहे. ग्रेड ए कार्यालयांसाठीची सातत्याने मागणी असल्याने जागा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २०१० मध्ये असलेल्या रिकाम्या जागांचे १० टक्क्यांचे प्रमाण २०२० मध्ये पाच टक्क्यांवर आले आहे.

गुंतवणूकदारांना ग्रेड ए कार्यालय आणि औद्योगिक मालमत्ता यात आवड आहे. कारण, त्यातून दीर्घकालीन स्थिर परतावा मिळू शकतो. तसेच, त्यातून शहरातील मायक्रो-मार्केट्समध्ये कार्यालये आणि औद्योगिक मालमत्तांवर भर देणाऱ्या फंडांचे व्यवहार होण्याची शक्यता असते. २०२१ मध्ये गुंतवणुकीचे नवे पर्याय उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

– संजय बजाज, व्यवस्थापकीय संचालक, लॉजिस्टिक्स अॅण्ड इंडस्ट्रिअल विभाग, जेएलएल इंडिया

Also Read: डीएसके प्रकरण : शिरीष कुलकर्णी यांचा जामीनासाठी अर्ज

जेएलएलचा अंदाज

 • मागणी आणि पुरवठ्यातील समतोल कायम राहील

 • औद्योगिक वसाहती आणि गोदामांच्या विकासासाठी पुणे देशातील सर्वाधिक आकर्षक बाजारपेठ ठरेल

 • व्यावसायिक जागांचा वापर २०२१ मध्ये पुन्हा वाढेल

 • बाजारपेठेला चालना मिळण्यात ई-कॉमर्स, लॉजिस्टक, एफएमसीजी क्षेत्राचा वाटा मोठा असेल

 • व्यावसायिक जागा वापरण्याचे प्रमाण २०२२ मध्ये चार दशलक्ष चौरस फुटांपर्यंत जाईल

 • मेट्रो आणि रिंग रोडमुळे पुण्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल होणार

महत्त्वाच्या बाबी

 • गोदामांच्या कामांमध्ये २०१८ पासून मोठी वाढ

 • रखडलेली बांधकामे पूर्ण करण्यास सुरुवात झाल्याने बाजारपेठेला पुन्हा गती

 • रिअल इस्टेटच्या बाजारपेठेतील पुरवठ्यात ३० टक्क्यांनी वाढ

 • उत्पादन क्षेत्रातील बहुतांश घडामोडी चाकण, तळेगाव आणि नगर रोड अशा उत्तर भागांमध्ये

 • खराडी, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडी या आयटी हब असलेल्या भागांत रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा (आरईआयटी) वाटा ४९ टक्के

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here