सातारा : खुर्चीला चिटकून राहणार नसल्‍याचे सांगत राजीनामा दिल्‍याचे सांगणाऱ्या पालिकेच्या बांधकाम समितीच्या सभापती सिद्धी पवार (siddhi pawar) यांचा राजीनामा (resignation) सहा दिवस झाले तरी मिळालेला नाही. तथ्यहीन आरोप, त्रागा करणाऱ्या सिद्धी पवारांच्‍या मूळ संस्‍कृतीचे, त्‍यांच्‍या तथाकथित बुद्धिमत्तेचा स्‍तर सातारकरांना समजला आहे. त्रागा करत कथित बुद्धिमत्ता दाखवणाऱ्या पवार यांच्‍या प्रभागात खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्‍या नेतृत्वाखाली दोन कोटी ३७ लाखांची सुमारे ३७ कामे केल्‍याची माहिती नगराध्‍यक्षा माधवी कदम (madhavi kadam) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (satara-political-news-madhavi-kadam-addressed-media-on-resignation-letter-siddhi-pawar)

कामे होत नसल्‍याचा कारणावरून, तसेच नगराध्‍यक्षा माधवी कदम यांच्‍या कार्यपद्धतीवर हरकत घेत सिद्धी पवार यांनी पदाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले होते. या घोषणेस सहा दिवस झाले तरी त्‍‍यांचा राजीनामा पोचला नसल्‍याचे कदम यांनी सांगत पवार यांचे आरोप हास्‍यास्‍पद असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. पवार यांच्‍या प्रभागातील अटल स्‍मृती उद्यानाचे काम काही दिवसांत सुरू होणार असून, त्‍यासाठीची तांत्रिकता सध्‍या सुरू आहे. याचबरोबर शहरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालये उभारण्‍याचा विषय अंतिम टप्‍प्‍यात असून, त्‍यापैकी काही कामे मार्गी लागली आहेत. पोहण्‍याच्‍या तलावासाठीचे चार कोटींचे अंदाजपत्रक पालिकास्‍तरावर करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या प्रभागात खासदार उदयनराजेंच्‍या सूचनेनुसार ३७ कामे प्रस्‍तावित केली होती. त्‍यापैकी २० कामे पूर्ण झाली आहेत. उदयनराजेंना आदर्श मानत राजीनामा देत असल्‍याचे सांगणाऱ्या पवार यांचा राजीनामा अजून पालिका प्रशासनाकडे आलेला नसून निराधार, बिनबुडाचे आरोप करणे लोकप्रतिनिधींना शोभत नसल्‍याचेही नगराध्यक्षांनी पत्रकात नमूद केले आहे.

Also Read: उदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; ‘मराठा आरक्षणा’साठी केल्या 6 मागण्या

…कुठे शामभटाची तट्टाणी

उदयनराजेंनी ज्‍याप्रमाणे खासदारकीचा राजीनामा दिला होता, तोच आदर्श घेत सभापतिपदाचा राजीनामा देत असल्‍याचे पवार यांनी नमूद केले होते. हाच धागा पकडत राजीनाम्‍याबाबत आपण कोणाशी बरोबरी करतो, याचे भान पवार यांना राहिलेले नाही. बिनबुडाचे आरोप करत सर्वसामान्‍य सातारकरांची दिशाभूल करणाऱ्या पवारांचे वर्तन शामभट्टाची तट्टाणी अशा प्रकारचे असून, त्‍यांनी स्‍वत:ची तुलना इंद्राच्‍या ऐरावताशी करू नये. पक्ष, गट-तट न बघता कामे करण्‍याचे उदयनराजेंचे आदेश आहेत. पालिकेत कोणी जादू करीत नाही, कोणी जादुगार नाही. त्‍यांना विकासकामे जादूप्रमाणे लगेच मार्गी लागावी, असे वाटत असेल तर त्यांना कोणी तरी जादूगारच भेटणे आवश्‍‍यक असल्‍याचा टोमणाही कदम यांनी पत्रकात लगावला आहे.

Also Read: शिपायाला चढली दारुची नशा; संपूर्ण गावाला झाल्या जुलाब अन् उलट्या

Udayanraje Bhosale

सिद्धी पवारांविरोधात पोलिसांत तक्रार

भुयारी गटार योजनेच्‍या कामावरून फोन करत शिवीगाळ, दमदाटी केल्‍याप्रकरणी सातारा पालिकेच्‍या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्‍याविरोधात आज शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात अदखलपात्र तक्रार नोंदविण्‍यात आली. ही तक्रार ठेकेदार वशीम आप्पा तहसीलदार (रा. एकता कॉलनी, करंजे) यांनी नोंदवली आहे. त्यात त्‍यांनी एक जानेवारीला कामादरम्‍यान भिंतीला गेलेले तडे दुरुस्‍त करण्‍याच्‍या कारणावरून सिद्धी पवार यांनी फोन करत कोटेश्‍वर मैदानाजवळ असताना शिवीगाळ, दमदाटी केली असल्‍याचे तहसीलदार यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here