जळगाव : बारावीची लेखी परीक्षा (12th Exam) रद्द (Canceled) झाल्यानंतर गुणनिर्धारणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विज्ञान शाखेसाठी (branch of science) आवश्‍यक प्रात्यक्षिकांचे गुण कसे द्यायचे, हा प्रश्‍न असल्याने किमान आता प्रात्यक्षिक परीक्षा (Demonstration test) घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या (Department of Education) विचाराधीन आहे. अर्थात, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. (twelfth standard students demonstration test under consideration)

Also Read: १५ दिवसात रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटीचे नुकसान !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा होऊ शकली नाही. सुरवातीला ‘सीबीएसई’च्या परीक्षा रद्द झाल्या. नंतर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने ही परीक्षा रद्द केली. बारावीच्या परीक्षेबाबत याच धर्तीवर दोन्ही मंडळांनी निर्णय जाहीर केला. या परीक्षा रद्द करण्यासोबत शासनाने गुणनिर्धारणाचे निकषही जाहीर केले आहेत.

असे असेल गुणनिर्धारण
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर नववीतील गुण व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनावर गुणनिर्धारण केले जाणार आहे. बारावीच्या वर्गाबाबतही अकरावी व बारावी अशा दोन्ही वर्गांतील मूल्यांकन विचारात घेतले जाणार आहे.

Student

प्रात्यक्षिकांचे काय?
असे गुणनिर्धारण होणार असले तरी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर गेले संपूर्ण वर्ष शाळा, महाविद्यालये बंद होती. बारावीचे वर्गही होऊ शकले नाहीत. विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना विशेष महत्त्व असते. किंबहुना प्रात्यक्षिकांचा भागच या अभ्यासक्रमात महत्त्वाचा असतो. मात्र, प्रात्यक्षिकेही मर्यादित प्रमाणात झाली. फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या तीनही विषयांसाठी प्रात्यक्षिकांची गरज असते. त्यावरच उच्चशिक्षणाचा पाया अवलंबून असतो. मात्र, कोविडमुळे सध्या शाळा- महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकांची तयारीच झालेली नाही.

Also Read: दुसरी लाट ओसरतेय..चार तालुक्‍यात सक्रीय रुग्ण पन्नासच्या आत

परीक्षा घेण्याचा विचार
बारावीच्या विद्यार्थ्यांनाची ऑनलाइन प्रात्यक्षिकांची उजळणी करण्यात आली. मात्र, या प्रात्यक्षिकांबाबत ही प्रणाली परिपूर्ण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक किती आत्मसात केले, त्याच्या मूल्यमापनासाठी किमान प्रात्यक्षिक परीक्षा तरी घ्यावी, असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. लवकरच याबाबत दिशानिर्देश येण्याची शक्यता आहे.

Exam

गेल्या वर्षी महाविद्यालय पूर्णपणे बंद होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दोन महिने प्रात्यक्षिके करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. शासनाने निर्देश दिल्यानंतर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेता येईल.
– प्रा. डॉ. एस. एन. भारंबे, प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय

बारावीची परीक्षा रद्द झाली असली तरी प्रात्यक्षिकांच्या परीक्षांबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. शिक्षण विभागाकडून तशी चाचपणीही सुरू असून, प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकतात. शिक्षण विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्या-त्या महाविद्यालयात या परीक्षा घेण्याचे नियोजन करता येईल.
– डॉ. गौरी राणे, प्राचार्य, बेंडाळे महिला महाविद्यालय

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here