रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. लवकरच सोलापूर विभागाला गाड्या सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील.

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील हुतात्मा, सिद्धेश्वर एक्सप्रेससह अन्य चार गाड्या एक जुलैपासून सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. (four more trains including hutatma, siddheshwar express in solapur section of central railway are expected to start from July 1)

Also Read: विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ चार नावांची चर्चा

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने विभागातील बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र (ता.7) जूनपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हीड विशेष गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या व अपुऱ्या गाड्यांची संख्या पाहता गाड्या सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर एक जुलैपासून विभागात गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती कमी होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. लवकरच सोलापूर विभागाला गाड्या सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील.

Also Read: आगामी महापौर राष्ट्रवादीचाच! कोठेंमुळे आत्मविश्वास वाढला

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर विभागातील प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यात सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सोलापूर- सिद्धेश्वर एक्सप्रेस, सोलापुर- हसान एक्स्प्रेस, मुंबई- गदग एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र लवकरच या गाड्यांनी सोलापूरकरांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या गाड्या सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे.

Also Read: पुण्यात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

या गाड्या सुरू होण्याची शक्यता

सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सोलापूर- सिद्धेश्वर एक्सप्रेस, मुंबई गदग एक्सप्रेस, सोलापूर- हसन एक्सप्रेस, लातूर- कुर्डुवाडी- मुंबई एक्सप्रेस.

(four more trains including hutatma, siddheshwar express in solapur section of central railway are expected to start from July 1)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here